लय भारी! संक्रांतीनिमित्त तेलुगू चित्रपट निर्माते करणार बक्कळ कमाई, तिकीटांना लावणार आपल्या मनाचे दर


चित्रपट निर्माते नेहमीच कोणताही सिझन पाहून त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत असतात. कोणत्या परिस्थितीत त्यांना फायदा किंवा तोटा होऊ शकतो, या सगळ्याचा विचार ते करत असतात. टॉलिवूड निर्माते सहसा डिसेंबर महिन्यात त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत नाहीत. कारण, या दिवसात अनेकजण सुट्टीची योजना आखत असतात आणि याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर होत असतो. परंतु या वर्षी मात्र या दिवसात अनेक मोठ्या बजेटचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ही गोष्ट साधारणतः सगळ्यांना माहित आहे, परंतु चित्रपटांची तिकिटे स्वस्त दरात जात असल्याने निर्मात्यांना या गोष्टीचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे ते आंध्र प्रदेश सरकारसोबत बातचीत करणार आहेत. अशातच बातमी समोर आली आहे की, आंध्र प्रदेश सरकारने तेलुगू चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या मर्जीने तिकीटे विकण्याची परवानगी दिली आहे.

खरं तर, आंध्रप्रदेश सरकारने तेलुगू चित्रपट निर्मात्यांना केवळ मकर संक्रांतीनिमित्त त्यांच्या मर्जीने तिकीटे विकण्याची परवानगी दिली आहे आणि सांगितले आहे की, सणानंतर सरकार यात काहीही दखल करणार नाही. निर्मात्यांना स्पष्ट सांगितले आहे की, सरकारचे हे नियम संक्रांतीनंतर लागू होणार नाही. (Filmmaker allowed to hike film tickets cost makar sankranti in ap bhojpuri south)

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे तेलुगू चित्रपट निर्मात्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाचे निर्माते आधीच कमी तिकीट असल्यामुले चिंतेत होते. कारण, मोठे बजेट असणाऱ्या चित्रपटांना पहिल्याच आठवड्यात चांगल्या बॉक्स ऑफिसची अपेक्षा असते. सरकारने हा निर्णय घेतला नसता, तर त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले असते.

या आदेशानंतर एसएस राजामौली यांच्या ‘राधेश्याम’, ‘भीमला नायक’ यांसारख्या चित्रपटांना फायदा होणार आहे. हे चित्रपट संक्रांतीनिमित्त प्रदर्शित होणार आहेत. यासोबतच ‘आचार्य’, ‘बाळकृष्ण की अखंड’, ‘नानी की श्याम सिंघा रॉय’ यांसारखे अनेक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे अनेक मोठे बजेट असणाऱ्या चित्रपटांच्या तिकिटांचे दर प्रत्येकी २५० रुपये असणार आहे. पवन कल्याण यांचा ‘भीमला नायक’ बॉक्स ऑफिसवर इतर चित्रपटांशी टक्कर टाळण्यासाठी संक्रांतीच्या शर्यतीतून बाहेर पडला, तर त्याच्या निर्मात्यांना तिकिटांच्या वाढीव किंमतीतून कमाईच्या या फेस्टिव्हल ऑफरलाही तोटा होऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फोटोत आजीसोबत बसलेल्या चिमुकल्याला ओळखलं का? आहे आपल्या वडिलांसारखाच सुपरस्टार

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे


Latest Post

error: Content is protected !!