Thursday, June 1, 2023

‘पठाण चित्रपटातून वाद निर्माण होणारे आउटफीटवाले सीन काढून टाका नाही, तर…’,एमपी गृहमंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूडमधील बादशाह आणि किंग खान म्हणून शाहरुख खान ओळखला जातो. त्याच्या अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा आगामी येणाऱ्या ‘पठाण‘ चित्रपटाच्या अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतंच यामधील ‘बेशरम रंग‘ गाणं प्रदर्शित झालं असून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलं आहे. चित्रपटाच्या गाण्यासोबतच ट्रेलरवरही नेटकऱ्यांनी निशाना साधला असून #पठान बाॉयकॉट ट्रेंड सुरु झाला आहे.

अभिनेता शाहरुख खान (Sharukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) याच्या पठाण चित्रपटामधील खूपच बोल्ड सिन दाखवले आहेत. त्यासोबतच दीपिकाने अभिनय कमी आणि अंग प्रदर्शन जास्त केल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. त्याशिवाय ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) गाण्याला देखिल जोरदार ट्रोल केलं जातंय. बेशरम रंग हे गाणं (दि, 12 डिसेंबर) रोजी प्रदर्शित झालं असून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. गाण्याला ट्रोल करत मिम्स बनवून गाण्याचा बजार उठवला जातंय. त्याशिवाय गाण्याचे संगित देखिल जैन मधील मरीबा गाण्याची नक्कल केली आहे. असा आरोपही पठाण चित्रपचावर लावला जातोय.

पठाण चित्रपटामध्ये दीपिकाचा बोल्ड लूक आणि ग्लॅमरस अवतार याच्यावरही नेटकऱ्यांनी निशाना साधला आहे. त्याशिवाय बेशरम रंग गाण्यमधील तिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या आउटफिटचीही चांगलीच खिल्ली उडवली आहे. चाहतेच नाही, तर राजकारणी देखिल पठान चित्रपटाच्या गाण्याविरोधात आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम यांनी विरोध केला असून चित्रपटातील काही सीन काढून टाकण्यास सांगितले आहे. त्याशिवाय त्यांनी निर्मात्याला धमकी देखिल दिली आहे की, “पठाण चित्रपटातील वाद निर्माण होईल अशाप्रकारचे आउटफीटचे सीन जर हटवले नाही, तर एमपी मध्ये चित्रपटाचं प्रदर्शना होऊ देणार नाही, याच्यावर विचार केला जाइल.”

दीपिकाच्या इंटिमेंट सीनमुळे तिला जोरदार ट्रोल केलं जातंय. 2020 साली दिपिकाने जेएनयू विद्यापिठामधील विद्यार्थ्यांसोबत हिंसा विरोधात आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. मात्र, पठाण चित्रपटानंतर दीपिकाचे जेएनयूमधील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आजपर्यत दिपिकाचा या चित्रपटामधील सर्वात जास्त ग्लॅमरस लूक दाखवला असून शाहरुख आणि तिच्या इंटिमेट डान्समुळे पठाणला बॉयकॉट करण्याची मागनी नेटकरी करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बिग ब्रेकिंग! अभिनेत्री विणा कपूर अजूनही जिवंत, पोलिसांसमोर हजर होत सर्वांनाच दिला धक्का

ब्रेकिंग! मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचे अचानक निधन, कलाविश्वावर शोककळा

हे देखील वाचा