Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बॉलिवूडवर भीतीचं सावट! कपूर घराण्यातील ‘या’ चार सदस्यांना झाला कोरोना

कोरोनाने (Covid-19) पुन्हा एकदा आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोव्हिडची प्रकरणे सातत्याने वाढत असून, हा व्हायरस आता पुन्हा बॉलिवूडमध्ये शिरकाव करत आहे. अलीकडेच करीना कपूर (Kareena Kapoor), अमृता अरोरा (Amrita Arora) यांच्यासह अनेकांना कोरोना झाला होता आणि आता कपूर कुटुंबातील आणखी काही लोकांना कोव्हिडची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

कपूर कुटुंबावर कोरोनाचा कहर
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे आणि याचा संसर्ग आता बॉलिवूडमध्येही पोहोचला आहे. अलीकडेच करीना कपूर मैत्रीण आणि मलायका अरोराची (Malaika Arora) बहीण अमृता हिला कोरोनाची बाधा झाली होती. आता अर्जुन कपूर (Arjun Kapoor), त्याची बहीण अंशुला (Anshula Kapoor), रिया कपूर (Rhea Kapoor) आणि तिचा पती करण बुलानी (Karan Bulani) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. (four members of kapoor family got corona positive)

Photo Courtesy: Instagram/rheakapoor

मलायकाचीही होणार कोव्हिड टेस्ट
या चौघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अर्जुन कपूरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, आता मलायका अरोराचीही टेस्ट होणार आहे. अर्जुन नुकताच मलायकाच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी गेला होता आणि त्यात करीना आणि अमृताही उपस्थित होत्या. अमृताला आधीच कोरोना झाला होता आणि नुकताच तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, त्यानंतर ती पार्टीला पोहोचली होती.

क्वारंटाईन आहेत चौघे
माध्यमातील वृत्तानुसार, अर्जुन, रिया, अंशुला आणि करण बुलानी यांना घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, सर्वांना सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात आले. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, अर्जुन आणि अंशुलाला पुन्हा कोरोना झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्येही दोघांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता.

रणवीर शौरीलाही झाला कोरोना
मंगळवारीच (२८ डिसेंबर) अभिनेता रणवीर शौरीचा मुलगा हारूनही कोरोना संसर्गाचा बळी ठरला. सोशल मीडियावर याबाबत माहिती देताना रणवीर शौरीने लिहिले की, “मी आणि माझा मुलगा हारून गोव्याला सुट्टीसाठी गेलो होतो आणि मुंबईला परतण्याचे फ्लाइट पकडण्यापूर्वी आरटी-पीसीआर चाचणीत तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आम्हा दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि पुढील चाचण्या होईपर्यंत लगेचच स्वतःला क्वारंटाइन केले आहे. ही लहर खरी आहे.”

आता बॉलिवूडची ही वाढती प्रकरणे पाहता, चाहतेही भलतेच चिंतेत पडले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा