Sunday, December 8, 2024
Home बॉलीवूड अधिक सुंदर दिसण्याची हाव ‘या’ अभिनेत्रींना पडली महागात, कुणी झाल्या विद्रुप, तर कुणी गमावलाय जीव

अधिक सुंदर दिसण्याची हाव ‘या’ अभिनेत्रींना पडली महागात, कुणी झाल्या विद्रुप, तर कुणी गमावलाय जीव

सिनेजगतातून अलीकडेच एका अभिनेत्रीच्या धक्कादायक मृत्यूची बातमी समोर आली होती. अवघ्या २१ वर्षांची दाक्षिणात्य अभिनेत्री चेतना सिन्हा, हिचा प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण सर्वांसाठीच धक्कादायक होते. पण मंडळी, अशा प्रकारे सर्जरी करणारी किंवा स्वतःच्या शरीरासोबत कृत्रिम सौंदर्यासाठी खेळ करणारी चेतना ही काही पहिलीच नव्हती. सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केलेल्या आणि अशा सर्जरी अंगाशी आलेल्या कलाकारांची मोठी यादीच सिनेजगतात पाहायला मिळते. कोण कोण आहेत हे कलाकार आणि त्यांनी कसली सर्जरी केली होती, हे आपण या लेखातून पाहूयात.

मंडळी, हिरोईन म्हटलं की प्रत्येकाच्याच डोळ्यासमोर एक प्रतिमा तयार झालेली असते. गोरापान चेहरा, रेखीव डोळे, चवळीच्या शेंगेंसारखा बांधा आणि बरंच काही. अशी हिरोईन म्हणजे लई भारी किंवा सुंदर असंच प्रत्येकाच्या डोक्यात असंत आणि म्हणूनच प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सुंदर दिसावं असं समजून अनेक अभिनेत्री यासाठी अनेक उपाय करत असतात. स्पष्ट मराठी भाषेत सांगायचं झालं म्हणजे चिकणं-देखणं दिसण्यासाठी त्या अनेक उपाय करतात, यात काही उपाय तर अगदी जालीम असतात. यापैकीच एक म्हणजे पॅस्टिक सर्जरी.

श्रीदेवी
सर्जरी करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूडची प्रसिद्ध अदाकारा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे नाव सामिल आहे. श्रीदेवी हे नाव जरी घेतली तरीही अनेकांच्या डोळ्यापुढे ८०- ९० चा तो काळ उभा राहतो. आपल्या मनमोहक अदांनी श्रीदेवीने लाखो प्रेक्षकांना वेड लावले होते. श्रीदेवीच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे असंख्य चाहते आजही पाहायला मिळतात. मात्र, तिचे हेच सौंदर्य तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. अभिनेत्री श्रीदेवीने सुंदर दिसण्यासाठी तब्बल २९ वेळा प्लॅस्टिक सर्जरी केली होती. तिच्या मृत्यूला तत्कालिन कारणासह अनेकदा केलेल्या सर्जरी हेही एक कारण होते असा दावा डॉक्टरांनी केला होता.

आयेशा टाकिया
मंडळी, तुम्हाला सलमान खानच्या वॉंटेड चित्रपटातील जान्हवी म्हणजेच अभिनेत्री आयेशा टाकिया तर माहितच असेल. आपल्या सोज्वळ सौंदर्याने ही जान्हवी बघता बघता भारतातील तरुणांची जान बनली होती. वॉन्टेड, टार्झन द वंडर कार अशा चित्रपटातील तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. मात्र, श्रीदेवी प्रमाणेच अभिनेत्री आयेशा टाकियालाही अशा सर्जरी करणे चांगलेच महागात पडले. आयेशाने प्लॅस्टिक सर्जरी केल्यानंतर तिचा चेहरा सुंदर दिसण्याऐवजी इतका बेडब दिसू लागला की आता चित्रपटसृष्टीतून गायब झालीये.

मौनी रॉय
सुंदर दिसण्यासाठी केलेल्या सर्जरी अंगाशी येणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मौनी रॉयचेही नाव सामिल आहे. आपल्या बोल्डनेसने तरुणाईची झोप उडवणाऱ्या मौनी रॉयनेही तिच्या ओठांची सर्जरी केली होती. पण ही सर्जरी करणे मौनीला चांगलेच महागात पडले. या सर्जरीचा तिच्या चेहऱ्यावर विपरित परिणाम झाला, ज्यामुळे तिचे ओठ मोठे आणि सुजल्यासारखे वाटतात. मौनी रॉय प्रमाणेच गौहर खानलाही अशा सर्जरीमुळे गोत्यात आणले होते.

राखी सावंत
आता विषय बॉलिवूडच्या तारकांचा सुरू आहे आणि त्यातही विषय सर्जरीचा आहे म्हटल्यावर राखी सावंतचे नाव तर घ्यावेच लागेल. अभिनेत्री राखी सावंत तिच्या अतरंगी फॅन्सी लूकमुळे आणि फॅशन्स सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. पण तुम्हाला माहितीये का, प्रसिद्धीसाठी राखी सावंतने तिच्या संपूर्ण शरीरावर डझनभर सर्जरी करुन ठेवल्या आहेत. अगदी ब्रेस्ट सर्जरी पासून ते जॉ लाईनच्या सर्जरीपर्यंत अशा अनेक सर्जरी तिने केल्या आहेत. पण पाहिलं तर अशा सर्जरींमुळे राखीचा चेहरा पहिल्यापेक्षा अधिक बेडब झाल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- सुंदर दिसण्यासाठी काय काय केलं? पण देवाने दिली शिक्षा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा