Thursday, September 28, 2023

ऋतिकला सुपरहिट करणाऱ्या दिग्गज व्यक्तीचे निधन; एक दिवसाआधीच चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

मनोरंजन विश्वातूमन एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध एडिटर संजय वर्मा यांचे दु:खत निधन झाले आहे. बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे त्यांनी एडिटिंगचे काम केले आहे. सध्या त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. राकेश रोशन यांचे ते आवडते एडिटर होते, असे बोलले जात होते. संजय वर्माने ऋतिक रोशनच्या वडिलांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या चमकदार कामामुळे त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. एवढेच नाही तर नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ‘द लास्ट शो’ या चित्रपटाचे ए़डिटींग देखील त्यांंनी केले.

संजय वर्मा (Sanjay Verma) यांच्या निधनाने इंडस्ट्रीला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. त्यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. अनेक सुपरहिट चित्रपट आणि मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करणाऱ्या बॉलीवूडच्या प्रसिद्ध एडिटरपैकी ते एक होते. ते त्यांच्या कामात इतके निष्णात होते, की त्यांनी राकेश रोशनपासून अनेक बड्या दिग्दर्शकांची मने जिंकली होती.

संजय वर्मा यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, त्यांच्या शेवटच्या चित्रपट ‘द लास्ट शो’ ला सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. Chhello Show हा 2021मध्ये आलेला गुजराती चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पान नलिन यांनी केले होते. ऑस्करसाठीही हा चित्रपट शॉर्टलिस्ट झाला होता.

संजय वर्मा यांच्या विषयी बोलायच झाले तर, संजय वर्मा यांनी ऋतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’, सलमान-शाहरुखच्या ‘करण अर्जुन’, रेखाच्या ‘खून भरी मांग’पासून अनेक सुपरहिट चित्रपटांचे एडिटींग केले होते. याशिवाय त्यांनी ‘कागज’, ‘कौन मेरा कौन तेरा’, ‘कयामत से कयामत तक’, ‘मिलेंगे मिलेंगे’ ते ‘कल किसने देखा’सह 52 हून अधिक चित्रपटांचे काम केले आहे. (Veteran editor Sanjay Verma, who produced Hrithik Roshan’s superhits, has sadly passed away)

अधिक वाचा- 
‘सुभेदार’बद्दल चिन्मय मांडलेकरांनी प्रेक्षकांना केले आव्हान; म्हणाले, ‘अनेक जण चित्रपट…’
‘कुठली माणसं…’ राष्ट्रीय पुरस्कारावरून आव्हाडांचा संताप, नेटकरी म्हणाले, ‘गरिबांना छळणार…’

हे देखील वाचा