नेहा पेंडसेने पोस्ट नवाकोरा व्हिडीओ; म्हणतेय, ‘देवाच्या कृपेने मी अशी आहे’


नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करत असलेली एक प्रतिभावान अभिनेत्री. हीच नेहा नेहमी वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. नुकतीच नेहाने अँड टीव्हीच्या ‘भाभीजी घर पे हैं’ या तुफान गाजणाऱ्या कार्यक्रमात एन्ट्री घेतली आहे. नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे व्हिडिओ, फोटो आणि तिच्याशी संबंधित माहिती ती फॅन्ससोबत शेयर करत असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हा व्हिडिओ नेहाच्या एका फोटोशूटचा असून यात तिने फोटोशूट करताना करत असणारी मजा शेयर केली आहे. नेहाने या व्हिडिओमध्ये साडी नेसलेली असून यात ती गजबची सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेयर करताना तिने लिहिले, “देवाच्या कृपेने मी अशी आहे.” अतिशय स्टाइलिश दिसणाऱ्या नेहाने तिच्या लूक्सने फॅन्सला नक्कीच घायाळ केले आहे.

नेहाने मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. २०१२ साली तिने टेलिव्हिजनवरच्या सर्वात विवादित शी ‘बिग बॉस’मध्ये सुद्धा स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

सध्या नेहा ‘भाभीजी घर पे हैं’ मध्ये काम करत आहे. तिच्या आधी ही भूमिका सौम्या टंडन करत होती. ५ वर्ष तिने ही मालिका केली मात्र काही करणाने तिने ही मालिका सॊडल्यानंतर हा रोल नेहाला मिळाला. नेहाने या भूमिकेला तिच्या अदानी, तिच्या अंदाजाने आणि तिच्या स्टाइलने सर्वाना तिची दखल घ्यायला भाग पडले आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी स्वीकारले असून, तिचे कौतुक देखील केले जात आहे.

हेही वाचा-
सिद्धार्थ- मितालीचे लोणावळ्यातील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल; एकदा पाहाच
प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माने शेअर केले बोल्ड फोटो; ट्रोलर्सने ड्रेसला म्हटले,  गाडीचा कव्हर 
हॉट लुक! बिकिनीवरील आलियाचे फोटो व्हायरल, सोशल मीडियावर पडतोय कमेंट्सचा पाऊस

 


Leave A Reply

Your email address will not be published.