Saturday, April 18, 2026
Home हॉलीवूड दुःखद! ग्रॅमी,ऑस्करसह अनेक मोठे पुरस्कार जिंकणाऱ्या हॉलिवूड संगीतकार बर्ट बछराच यांचे निधन

दुःखद! ग्रॅमी,ऑस्करसह अनेक मोठे पुरस्कार जिंकणाऱ्या हॉलिवूड संगीतकार बर्ट बछराच यांचे निधन

मनोरंजनविश्वात आज एक दुःखद बातमी समोर येत आहे. दिग्गज आणि प्रतिभावान हॉलिवूड संगीतकार बर्ट बछराच यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यानी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बर्ट बछराच यांनी संगीतविश्वात एक वेगळीच उंची आणि पद कायम केले. त्यानी त्यांच्या संगीताच्या अभ्यासाच्या जोरावर अतिशय उत्तम संगीत बनवले. फक्त ग्रॅमीच नाही तर ऑस्कर पुरस्कार देखील त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जिंकला. बर्ट बछराज यांनी त्यांच्या करियरमध्ये ‘डू यू नो द वे टू सॅन जोस’, ‘वॉक ऑन बाय’ आदी अनेक हिट गाणी दिली. बर्ट बछराज यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली आहे.

बर्ट यांचे निधन त्याच्या वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारामुळे ८ फेब्रुवारी २०२३ रोजी अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे त्यांच्या राहत्या घरात झाले. त्याची मॅनेजर असणाऱ्या टीना ब्रोसम यांनी ९ फेब्रुवारी रोजी याची माहिती सर्वांना दिली. विशेष बाब म्हणजे बर्ट हे नेहमीच जगातील सर्वच सामान्य लोकांचे आकर्षण असणाऱ्या अमेरिकेतील प्रिसिडेन्ट हाऊस ‘व्हाइट हाऊस’मध्ये नेहमीच पाहुणे म्हणून जात असायचे. मग भलेही राष्ट्रपति रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रेट त्यांना आमंत्रण दिले जायचे. २०१२ साली बर्ट यांनी एका अभियानासाठी ‘वॉक ऑन बाय’ हे गाणे काही सेकंदासाठी गायले होते. तेव्हा तत्कालीन प्रेसिडेंट बाराक ओबामा यांनी त्यांना गेर्शविन प्राइज दिले होते. बर्ट यांच्या गाण्याचे चाहते संपूर्ण जगात असल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

बर्ट यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ८ वेळा ग्रॅमी, तीन वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकला. त्यांना १९७० आणि १९८२ साली ऑस्कर देण्यात आला. त्यांना त्यांच्या ‘प्रोमिसिस प्रोमिसिस’साठी बोर्डवे पुरस्कार दिला गेला. त्यांनी ‘व्हाट्स न्यू, पुसीकॅट?’, ‘अल्फी’ ‘1967 जेम्स बॉन्ड स्पूफ कॅसिनो रोयाल’साठी साउंडट्रॅक केला होता. यासोबतच त्यांची ‘आई से ए लिटल प्रेयर’, ‘आई विल नेवर फॉल इन लव अगेन’, ‘दस गाय्ज इज इन लव विद यू’ आदी अनेक गाणी विशेष गाजली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
काली काली जुल्फों के …! रिधीमा पंडीतची घायाळ करणारी अदा, पाहाच फोटो गॅलरी
अनुपम खेर यांनी ट्विट करत ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची केली मागणी, अक्षय कुमारने देखील दिला दुजोरा

हे देखील वाचा