‘सबको आती नहीं और मेरी जाती नहीं!’ हीरोपंतीमधून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या अभिनेत्याला असं मिळालं ‘टायगर’ नाव, वाचा

Happy Birthday Tiger Shroff His Real Name Is Jai Heman Here Lesser Known Facts


बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेेत, ज्यांनी आपल्या अभिनय आणि स्टंटबाजीमुळे एक वेगळे स्थान निर्माण केेल आहे. यासोबतच त्यांनी आपल्या डान्समुळेही असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे आणि करत आहेत. या अभिनेत्यांपैकीच एक म्हणजे ‘टायगर श्रॉफ’. टायगर आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. खरं सांगायचं झालं, तर त्याचं नाव टायगर नाहीये. मग त्याचं खरं नाव काय? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेलच. चला तर मग त्याच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्याच्याबद्दलच्या खास गोष्टींवर नजर टाकूया…

‘हे’ आहे खरं नाव
त्याचा जन्म २ मार्च, १९९० रोजी मुंबईत झाला होता. विशेष म्हणजे त्याचे वडील जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. टायगरचं खरं नाव हे ‘हेमंत श्रॉफ’ असे आहे. परंतु त्याचे वडील लहानपणापासूनच त्याला टायगर नावाने बोलवायचे. अशामध्ये तो जेव्हा चित्रपटामध्ये आला, तेव्हा त्याने आपले नाव बदलून ‘टायगर’च ठेवले.

‘या’ चित्रपटातून केली अभिनय कारकीर्दीची सुरुवात
टायगर श्रॉफने सन २०१४ साली साजिद नाडियाडवाला निर्मित ‘हीरोपंती’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. टायगर डान्सचा शौकीन आणि फिटनेस फ्रीकही आहे. या चित्रपटात त्याने आपल्या डान्सने युवकांचे मन जिंकले, ज्यामुळे तो आपल्या पहिल्या चित्रपटामध्येच स्टार बनला होता. या चित्रपटातील त्याचे डायलॉग चांगलेच गाजले. त्यातील एक म्हणजे, ‘सबको आती नहीं और मेरी जाती नहीं.’ या चित्रपटासाठी त्याला गिल्ड, लाईफ ओके स्क्रीन आणि आयफा यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित केले होते.

‘ब्लॅक बेल्ट’
विशेष म्हणजे टायगरने तायक्वॉन्डोमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ आपल्या नावे केला होता. याव्यतिरिक्त त्याला लहानपणापासूनच डान्सचा शौक होता. दुसरीकडे मायकल जॅक्सन आणि ऋतिक रोशन हे त्याचे डान्स आयकॉन आहेत. त्याच्या डान्समधून हे स्पष्टपणे दिसून येते.

सन २०१४ साली त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासोबत ‘बागी’ चित्रपटात काम केले. त्याचा हा चित्रपटही भलताच हिट ठरला होता. यानंतर टायगरने ‘अ फ्लाईंग जट्ट’, ‘बागी ३’, ‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ आणि ‘वॉर’ या चित्रपटात काम केले. ‘वॉर’ हा त्याच्या कारकीर्दीतील सर्वाधिक हिट ठरलेला चित्रपट आहे. या चित्रपटात तो आपला डान्स आयकॉन ऋतिक रोशनसोबत दिसला होता.

टायगर आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याचे नाव अनेक वर्षांपासून अभिनेत्री दिशा पटानी हिच्यासोबत जोडले जात आहे. हे दोघेही नेहमी एकत्र पाहायला मिळतात. माध्यमांमध्येे असे वृत्त आहे की, टायगर आणि दिशा एकमेकांना डेट करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बापरे रे बाप.!! जेवढा लग्नात खर्च नाही झाला, तितका तर काडीमोड घेताना झालाय; पाहा बॉलिवूडमधील महागडे घटस्फोट

-रस्त्यावर चुकूनही गाऊ नका ही गाणी, नाहीतर थेट जेलची हवा खावी लागेल! पाहा कोणती आहेत ती गाणी…..

-एकेकाळी ‘गुड्डू भैय्या’कडे कॉलेजची फी भरायलाही पैसे नसायचे, पहिल्या पगाराचा आकडा माहितीये? वाचा अलीची संघर्षगाथा


Leave A Reply

Your email address will not be published.