‘मुन्नीला पाकिस्तानला सोडवायला मीच जाणार’, हर्षालीच्या व्हिडिओवर युजरची लक्षवेधी कमेंट


सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हर्षाली मल्होत्रा म्हणजेच मुन्नी. लहान दिसणारी मुन्नी आता खूप मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत असतात. ती तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते. तिला तिच्या एकाच चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे आता तिचे फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. अशातच तिचा एक नवीन व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या व्हिडिओमध्ये खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे.

हर्षालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने गुलाबी रंगाचा ड्रेस सुंदर डान्स स्टेप्स केल्या आहेत. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “डान्स हा आत्म्याची छापलेली भाषा आहे.”

हर्षाली या व्हिडिओमध्ये कधी बंदूक चालवताना, तर कधी फोनवर बोलताना तसेच कधी डीजेवर गाणी लावताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. एका युजरने या व्हिडिओवर लक्षवेधी कमेंट करून लिहिले आहे की, “या वेळेस मुन्नीला पाकिस्तानला‌ सोडवायला मी जाणार आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “तुझा प्रत्येक डान्स व्हिडिओ सुपरहिट असतो.” तिच्या या डान्स व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हर्षाली 2014 मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. कबीर खान यांनी बजरंगी भाईजान या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात सलमान खान आणि हर्षाली सोबतकरीना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी हे देखील होते. पाकिस्तानमधून आलेल्या लहान मुलीला तिच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी सलमान खान त्याच्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानमध्ये कसा जातो, ही कहाणी या चित्रपटातून दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नुसता राडा! पवन सिंगच्या ‘पुदिना ए हसीना’ गाण्यावर शिवानी सिंगचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

-‘काय रे जब्या, जिच्यासाठी तू काळी चिमणी…’, शालूच्या डान्स व्हिडिओवर युजरची भन्नाट कमेंट होतेय व्हायरल

-गुलाबी साडीत ‘जलेबी बाई’ बनून थिरकली आलिया भट्ट, डान्स व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.