भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग हा त्याच्या चित्रपटासाठी जेवढा प्रसिद्ध आहे. तेवढाच तो त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. त्याची गाणी प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तसेच त्याच्या गाण्यांना भोजपुरी प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्याला भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ‘पावर स्टार’ म्हणतात. काही दिवसांपूर्वी त्याचे ‘पुदिना ए हसीना’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे खूप व्हायरल झाले होते. प्रेक्षकांनी देखील या गाण्याला खूप प्रेम दिले होते.
या गाण्याला काही दिवसातच 15 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते. त्यानंतर अनेक जण या गाण्यावर डान्स करून व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. असाच एक धमाकेदार व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
पवन सिंगचे ‘पुदिना ए हसीना’ गाण्यावर यूट्यूब स्टार शिवानी सिंगने दमदार डान्स केला आहे. शिवानीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप संख्येने पहिला जात आहे. या व्हिडिओमध्ये शिवानीने गुलाबी रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. ती गच्चीवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिवानी खूपच हॉट दिसत आहे. या गाण्यातील तिचे हावभाव प्रेक्षकांना खूपच आवडले आहेत. शिवानीने याआधी देखील अनेक गाण्यांच्या व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.
पवन सिंगचा ‘पुदिना ए हसीना’ या गाण्याबाबत बोलायचे झाल्यास, त्याचे हे गाणे आताच 5 जूनला वेव्ह म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे खूप प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. तसेच हे गणे खूप वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्याला पवन सिंग सोबत अनुपमा यादवने गायले आहे. कुंदन पांडे आणि अर्जुन अकेला यांनी या गाण्याचे लिरिक्स लिहिले आहे. तसेच प्रियांशू सिंग याने संगीत दिले आहे. या गाण्याला आतापर्यंत 1 कोटी पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: जेव्हा १९ वर्षीय दिशा पटानीने दिले होते पहिले ऑडिशन; ओळखणेही झाले कठीण
-‘…सर्वकाही डोळ्यात असतं!’, म्हणत मराठमोळ्या अमृता खानविलकरचं ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोशूट आलं चर्चेत