‘योगा से ही होगा…’, म्हणत ‘मुन्नी’ने केले योगासन करतानाचे फोटो शेअर, पडतोय लाईक्सचा पाऊस


दरवर्षी 21 जून हा दिवस ‘जागतिक योगा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 2015 पासून या योग दिनाची सुरुवात झाली होती. यावर्षी आपण 7 वा योग दिन साजरा करत आहोत. या निमित्त अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे योगा करताना फोटो शेअर करून सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांचा अनुभव शेअर करत आहेत. यातच ‘बजरंगी भाईजान’ फेम अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा हिने देखील सोशल मीडियावर योगासन करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

हर्षाली मल्होत्राने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून योगासन करताना फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तुमचा आत्मा तुमचा सर्वात जवळचा मित्र आहे. त्याची काळजी घ्या आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जा. त्याच्यावर प्रेम करा. हे योगामुळेच होऊ शकते. जागतिक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

तिच्या चाहत्यांना तिचे हे फोटो आणि कॅप्शन खूपच आवडले आहे. चाहत्यांकडून तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय. या फोटोला आतापर्यंत 80 हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हर्षालीने काही दिवसांपूर्वी तिचा 13 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिने तिच्या साध्या लूकने सर्वांच्या मनात तिचे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिचा कंगना रणौतच्या डायलॉगवर लिप सिंक करतानाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत होता. यावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी योगा दिनाची एक थीम निश्चित करण्यात आली आहे. या वर्षीच्या योग दिनाची थीम आहे, ‘बी विथ योग, बी ऍट होम.’

हर्षाली 2014 मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानंतर कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. कबीर खान यांनी ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सलमान खान आणि हर्षाली सोबत करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी हे देखील होते. पाकिस्तानमधून आलेल्या लहान मुलीला तिच्या मायदेशी पोहोचवण्यासाठी सलमान खान त्याच्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानमध्ये कसा जातो, ही कहाणी या चित्रपटातून दाखवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री


Leave A Reply

Your email address will not be published.