‘मेन विल बी मेन!’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम निखिल राऊतच्या मजेदार व्हिडिओची इंटरनेटवर धमाल


‘फर्जंद’ चित्रपटात किसना ही व्यक्तीरेखा साकारून अभिनेता निखिल राऊत बराच प्रसिद्ध झाला होता. त्याने ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेता ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेद्वारे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यातील त्याच्या व्यक्तीरेखेला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. याशिवाय अभिनेता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. आता नुकत्याच समोर आलेल्या त्याच्या एका मजेदार व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तो बराच चर्चेत आला आहे.

हा व्हिडिओ स्वतः निखिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि आणि त्रियुग मंत्रीसोबत दिसला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, निखील आणि त्रियुग लिफ्टमध्ये थांबलेले असतात. तेव्हा मीरा देखील लिफ्टमध्ये चढते. मीरासारख्या सुंदर स्त्रीला पाहून, निखिल आणि त्रियुग हे पुरुष चांगलेच खूश होतात. तिच्यासमोर आपला चांगला प्रभाव पडावा यासाठी, ते दोघे त्यांचे पुढे आलेले पोट आतमध्ये घेतात आणि ती निघून गेल्यानंतर पुन्हा आहे त्या स्थितीत करतात.

वास्तविक निखिलने शेअर केलेला हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे. या मजेदार व्हिडिओद्वारे त्यांनी सांगितले आहे की, कशाप्रकारे सर्व पुरुष सारखेच असतात आणि एखाद्या सुंदर स्त्रीला बघून भाळतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये निखिलने ‘पुरुष हे पुरुषच असतात’ (men will be men) असं लिहिलेलं आहे. गंमतीच्या हेतूने बनविलेला हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे. विशेष म्हणजे हे तिघेही कलाकार ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत झळकत आहेत.

निखिल राऊतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. त्याने ‘तू तिथे मी’, ‘तू माझा सांगती’, ‘काहे दिया परदेस’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केले आहे. ‘वळू’ चित्रपटात त्याने गण्याचे पात्र साकारत रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले होते. ‘फर्जंद’, ‘फत्तेशीकस्त’ चित्रपटातील त्याची भूमिका विशेष गाजली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.