बालकृष्ण यांनी रवी तेजाला विचारले अं’मली पदार्थ प्रकरणाशी संबंधित प्रश्न, अभिनेता म्हणाला…


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) काही दिवसांपूर्वी अं’मली पदार्थ प्रकरणामुळे खूप चर्चेत आहे. अशा परिस्थितीत आता रवी लवकरच बाळकृष्ण नंदमुरी (Balkrushna Nandmuri) यांच्या ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके’ या टॉक शोमध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान, आता या शोच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते रवीला अं’मली पदार्थ संबंधित प्रश्न विचारताना दिसत आहे आणि तो त्यांना बिनधास्तपणे उत्तरही देत आहे. या एपिसोडमध्ये रवी गोपीचंद मालिनेनी यांच्यासोबत पाहुणे म्हणून येणार आहे.

यादरम्यान बाळकृष्ण यांनी रवीला विचारले की, “तुम्ही आरोग्य आणि फिटनेसबाबत इतके जागरूक आहात, मग तुमचे नाव अं’मली पदार्थ प्रकरणात कसे अडकले?” या प्रश्नाचे उत्तर खिलाडी अभिनेता रवी याने दिलेही. तो म्हणाला की, “मलाही त्रास झाला आणि मीही आश्चर्यचकित झालो.” तो या प्रकरणाबद्दल पुढे बोलला की, जे संपूर्ण एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतरच ऐकू शकता. नवीन वर्षाच्या निमित्ताने ‘अनस्टॉपेबल विथ एनबीके’ या टीव्ही शोचा हा भाग ३१ डिसेंबर रोजी थेट दिसणार आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये रवी तेजालाल ईडीने समन्स बजावले होते. २०१७च्या अं’मली पदार्थ प्रकरणात मनी लाँड्रिंगबद्दल त्याची चौकशी करण्यात आली होती. या शोमध्येच बालकृष्ण यांनी रवीचा काही वर्षांपूर्वी एका मुद्द्यावर चापट मारल्याच्या अफवांवरूनही शाळा घेतली. जुन्या वादाबद्दल अभिनेत्याने “ज्यांच्याकडे काम नाही ते अफवा निर्माण करतात,” असे म्हणत तडकाफडकी उत्तर दिले.

रवी तेजाने ६०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या रवीची फॅन फॉलोविंग कोटींच्या घरात आहे. ‘राउडी राठोड’ आणि ‘किक’ सारखे अनेक बॉलिवूड हिट रवी तेजाच्या चित्रपटांचे रिमेक आहेत. रवीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे तर, त्याने २६ मे २००२ रोजी कल्याणीसोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलीचे नाव मोक्षदा आणि मुलाचे नाव महाधन भूपतीराजू आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!