‘इंडियन आयडल १२’मधील पवनदीप अन् अरुणिताला मिळाला मोठा ब्रेक; ‘या’ गायकासाठी गाणार गाणे


‘इंडियन आयडल’ टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात प्रसिद्ध, मोठा आणि लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यातील गायक जगासमोर आणण्यासाठी हा शो ओळखला जातो. नवीन गायकांना एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा शो एक महत्त्वाची पायरी समजली जाते. सध्या ‘इंडियन आयडल’चे १२ वे पर्व सुरू आहे. आताच्या आणि यामागील सर्व पर्वांमधील स्पर्धकांना या शोमुळे नवी ओळख, काम मिळाली आहे. काही स्पर्धकांना तर त्यांच्या असणाऱ्या प्रतिभेमुळे पर्व संपायच्या आतच संगीतकारांनी काम देत त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली.

सध्या इंडियन आयडलच्या १२ व्या पर्वात देखील असेच काहीसे घडले आहे. या शोचा परीक्षक आणि प्रसिद्ध बॉलिवूड गायक, संगीतकार असणाऱ्या हिमेश रेशमियाने या शोमधील स्पर्धक पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल यांना लाँच करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. हिमेश त्याच्या ‘मूड्स विथ मेलोडीज’ या अल्बमच्या पहिल्या गाण्यातून या दोघांना लाँच करणार आहे. या पर्वातील टॉपच्या स्पर्धकांमध्ये पवनदीप राजन आणि अरुणिता कांजिलाल या दोघांची नावे घेतली जातात. हिमेशच्या या घोषणेमुळे या दोघांच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

‘सूरूर २०२१’ नंतर हिमेश रेशमियाने ‘मूड्स विथ मेलोडीज वॉल्यूम १’ या म्युझिकल अल्बमची घोषणा झाली असून, २१ जून रोजी जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने तो त्यांच्या पहिल्या गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहे. या गाण्यातून तो पवनदीप आणि अरुणिता एकत्र लाँच करणार आहे.

हिमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून या दोघांसोबत फोटो शेअर करत लिहिले, “२१ जून रोजी जागतिक संगीत दिन आहे. याच दिवशी मी माझ्या नवीन गाण्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करणार आहे. हे गाणे गायक पवनदीप आणि अरुणिता यांनी गायलं असून, ते ‘मूड्स विथ मेलोडीज’ या अल्बममधले आहे. या अल्बमचे पहिले गाणे मी संगीतबद्ध केले आहे आणि पवनदीप व अरुणिता यांनी गायले आहे. समीर अंजान यांनी लिहिलेले हे रोमँटिक गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”

दरम्यान पवनदीप आणि अरुणित यांचे गाणे लोकांना तुफान आवडत असून यूट्यूबवरही त्यांच्या गाण्याला मिलियन व्ह्यूज मिळत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.