मनोरंजनविश्वातील कलाकार नेहमीच त्यांचे विविध प्रकारचे हटके फोटोशूट करताना दिसतात. कलाकार आणि त्यांचे फोटोशूट हा नेहमीच मीडियासाठी, फॅन्ससाठी एक चर्चेचा विषय असतो. कलाकारांना लाइमलाइट आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी त्यांचे फोटोशूट मोठी भूमिका बजावत असते. कलाकारांच्या कामाचाच एक भाग म्हणून त्यांच्या फोटोशूटकडे पाहिले जाते. बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्री सर्वच कलाकार नेहमीच फोटोशूट करताना दिसतात.
नुकतेच टेलिव्हिजनची स्टार अभिनेत्री असलेल्या हिना खानने तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. हिना मालिकांमध्ये जरी अतिशय सोज्ज्वळ आणि सध्या सुनेची भूमिका साकारत असली तरी ती तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय बोल्ड आहे. हिनाचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले तर तिचे स्टायलिश लाईफ, तिची फॅशनवरील प्रेम दिसून येते. हिना नेहमीच तिच्या लुक्सवर विविध प्रयोग करत असते. नुकतेच तिने तिचे मोनोकिनीवरचे काही फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यामध्ये ती अतिशय आकर्षक आणि मादक दिसत आहे.
View this post on Instagram
हिना खानने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कलरफुल मोनोकिनीमध्ये दिसत असून, तिच्या हातात सर्फिंग बोर्ड देखील आहे. तिने तिच्या या लूकवर गॉगल लावले असून त्यामुळे तिचा लूक पूर्ण झाला आहे. यावर तिने तिचे केस पूर्ण बांधले आहे. यात ती खूपच स्लिम आणि तिचा कमनीय बांधा फ्लॉन्ट करताना दिसते. बीचवर फिरणारी, लाटांवर स्वार झालेली, पाणीमध्ये खेळणारी हिना सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, तिचे सर्वच अंदाज खूपच आकर्षक दिसत आहे. हिनाने तिचे हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “इंटरनेट आऊटडेटेड आहे, मी खरच सर्फ करते.” या फोटोंसोबत तिने अनेक हॅशटॅग दिले आहेत. त्यात तिने मालदीवला देखील टॅग केलेले दिसते. तिच्या या फोटोंवर तीन लाखांपेक्षा अधिक लाइक्स आले असून, हजारो कमेंट्स आल्या आहेत.
हिनाने काही टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून, तिला ‘ये रिश्ता क्या कहलता है’ मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवून दिली. हिना काही चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. हिनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ती रॉकी जैस्वालला डेट करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष
पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’










