‘स्टार वॉर्स रिटर्न ऑफ द जेडी’ आणि ‘हॅरी पॉटर एन्ड सोर्सेस स्टोन’ आदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका करणाऱ्या पॉल ग्रांट यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या केवळ ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान १६ मार्च रोजी पॉल यांना लंडनच्या एका मेट्रो स्टेशनवर बेवारसरित्या पडलेले पहिले गेले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले गेले आणि तेव्हाच त्यांना ब्रेन डेड घोषित केले गेले होते. पुढे रविवारी १९ मार्च रोजी त्यांना लावलेल्या सर्व लाइफ सर्पोटिव्ह सिस्टम काढण्यात आल्या आणि त्यांचे निधन झाले.
ग्रांट यांची मुलगी असणाऱ्या सोफी जेने ग्रांट यांनी एका न्यूज चॅनेलला त्यांच्या निधनाबद्दल सांगितले आहे. ते हे देखील म्हणाली की पॉल यांच्या निधनामुळे टी पूर्णपणे कोलमडली आहे. प्रत्येक मुलींसाठी वडिलांना गमावणे हे खूप मोठे आणि दुर्दैवी दुःख असते. ते खूपच प्रेमळ आणि कामाप्रती प्रामाणिक होते. हे त्यांच्या जाण्याचे वय नव्हते ते खूपच लवकर निघून गेले.”

द सनला दिलेल्या एका विधानात सोफी जेनेने सांगितले की, “मी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. माझे वडील खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्ती आणि उत्तम पिता होते. ते नेहमीच आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे आणि आम्हला भरपूर हसवायचे. ते कोणालाही मदत करण्यासाठी काहीही करायचे. त्यांना मदत करायला खूप आवडायची. ते आर्सेनलचे खूप मोठे चाहते होते. ते एक उत्तम अभिनेते, उत्तम वडील आणि उत्तम आजोबा होते. ते माझ्यावर, माझ्या भावावर आणि त्यांच्या मैत्रिणीवर मारियावर खूप प्रेम करायचे. सोबतच ते मारायच्या मुलांवर देखील खूप प्रेम करायचे. मी त्यांना खूप मिस करेल.”
ग्रांट यांची मैत्रीण असणाऱ्या मारियाने म्हटले की, “पॉल माझ्या जीवनाचे प्रेम होते. त्यांनी मला परिपूर्ण केले होते. त्याच्याशिवाय जीवनाची मी कधी कल्पना देखील केली नव्हती.” दरम्यान ग्रांट पॉल यांनी ‘स्टार वॉर्स’ आणि ‘हॅरी पॉटर’सोबत ‘द डेड’, ‘भूलभुलैया’ आदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांना एक स्टंट अभिनेता म्हणून देखील ओळखले जायचे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पॅपराझींना पोज दिल्याने सैफ करीनावर रागावला? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
रजनीकांत यांच्या मुलीचे लग्नातील लाखोंचे दागिने चोरीला; ‘या’ व्यक्तिवर व्यक्त केला संशय










