Tuesday, April 23, 2024

क्या बात है! हॉलिवूडमधील दिग्दर्शकाला करायचे आहे ‘या’ भारतीय सुपरस्टारसोबत काम, स्वतःच केला खुलासा

मागच्यावर्षी आलेल्या आरआरआर या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर मोठी छाप सोडली आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली. एवढेच नाही तर थेट ऑस्करमध्ये सिनेमाने नावलौकिक मिळवला. या सिनेमामुळे भारतात सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या रामचरण आणि जुनियर एनटीआर यांना संपूर्ण जगात मोठी ओळख मिळाली. त्यांना मोठी फॅन फॉलोविंग देखील मिळाली आहे. सामान्य लोकच नाही तर मोठमोठे कलाकार डॆहील यांचे फॅन आहेत. या यादीत आता अजून एका नावाची भर पडली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स गन यांचे. नुकतेच जेम्स यांनी एका मुलाखतीमध्ये जुनियर एनटीआरचे कौतुक केले आहे.

jemd hun

एका मोठ्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेम्स गन यांनी आरआरआर मधील जुनियर एनटीआरचा अभिनय पाहून प्रभावित झालो असल्याचे म्हटले आहे. सिनेमातील त्याचा अभिनय पाहून त्यांनी त्यांना कुल आणि हँडसम देखील म्हटले आहे. जेम्सने हे देखील सांगितले की, जर त्याला भविष्यात एखाद्या अभिनेत्याला गार्डीयन्स युनिव्हर्समध्ये सादर करायचे असेल तर तो जुनियर एनटीआरला करेल. त्याला जुनियर एनटीआरसोबत काम करण्याची मोठी इच्छा असल्याचे देखील जेम्सने सांगितले.

दरम्यान जुनियर एनटीआरबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या त्याच्या आगामी ‘एनटीआर 30’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर दिसणार असून, ती या सिनेमाच्या माध्यमातून तेलगू सिनेसृष्टीमधे पदार्पण करत आहे. तर ‘एनटीआर 30’ सिनेमातून सैफ अली खान देखील तेलगूमध्ये पदार्पण करत असून, तो या सिनेमात खलनायक साकारणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘या’ दिग्गज संगीतकाराने भर कार्यक्रमात केली पत्नीला मातृभाषेत बोलण्याची विनंती, नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

आनंदाची बातमी! टेलिव्हिजनवरील सुपरहिट मालिका इस प्यार को क्या नाम दूं फेम ‘हा’ अभिनेता झाला बाबा

हे देखील वाचा