हॉलिवूड अभिनेता क्रिस नॉथवर दोन महिलांनी लावला लैंगिक अत्याचाराचा आरोप, जवळच्या लोकांचा पाठिंबा


हॉलिवूडमधून अनेक बातमीत सातत्याने येत असतात. अशातच एक बातमी समोर आली आहे की, ‘सेक्स अँड द सिटी’ (Sex and the city) मधील अभिनेता क्रिस नॉथवर (Chris Noth) दोन महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. ही घटना काही काल किंवा आजची नाही, तर २००४ आणि २०१५ मधील आहे. या दोन महिलांनी हॉलिवूड माध्यमांना क्रिसबाबत ही माहिती दिली आहे. माध्यमातील वृत्तानुसार दोन महिला एकमेकींना ओळखत देखील नाही. त्यांनी वेग वेगळ्या पातळीवर हे आरोप लावले आहेत. यावर क्रिसचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या सहमतीने संबंध ठेवले होते. यात त्याची काहीही चूक नाही. त्याच्यावर हे खोटे आरोप लावले आहेत.

त्यातील एका ४० वर्षाच्या महिलेच्या सांगण्यानुसार ही घटना २००४ मधील आहे. तिचा असा आरोप आहे की, क्रिस नॉथने वेस्ट हॉलिवूडच्या एक अपार्टमेंटमध्ये तिचे लैंगिक शोषण केले होते, त्यावेळी ती केवळ २२ वर्षाची होती. तसेच ३१ वर्षाच्या महिलेने आरोप केला आहे की, २०१५ मध्ये न्यूयार्क सिटीच्या ग्रीनवीच अपार्टमेंटमध्ये तिच्यावर जबरदस्ती केली होती. तिने सांगितले की, त्यावेळी ती २५ वर्षाची होती आणि क्रिस ६० वर्षाचे होते. माध्यमातील वृत्तानुसार तिच्या जवळच्या लोकांनी देखील या गोष्टीला होकार दिला होता. तसेच त्यांचे मेसेज देखील समोर आले होते. (hollywood sex and the city actor chris noth accused of sexual assault by 2 women)

क्रिस नॉथने ‘लॉ अँड ऑर्डर’ आणि ‘सेक्स अँड द सिटी’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटात काम केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्याने सांगितले की, “माझ्या विरोधात त्या लोकांनी आरोप लावले आहेत, ज्यांना मी खूप वर्षांपूर्वी भेटलो होतो. हे सगळे आरोप खोटे आहेत. ही कहाणी ३० वर्षांपूर्वी किंवा ३० दिवसांपूर्वीची असू शकते; परंतु माझ्यासाठी नाही म्हणजे नाही. ही एक अशी मर्यादा आहे, जिला मी पार करू शकत नाही होत. जे काही झालं होत ते सहमतीने झाले होते.

त्याने पुढे सांगितले की, “या गोष्टी समोर येण्याची वेळ तर पाहा. मला नाही माहित ही घटना आता का समोर आली आहे. परंतु मला हे माहित आहे की, मी काहीही चुकीचे केले नाही.” क्रिस नॉथने अभिनेत्री तारा विल्सन हिच्याशी २०१२ मध्ये लग्न केले आहे. त्या दोघांना दोन मुले आहेत.

हेही वाचा :

रवीना टंडनला देखील झाला सारासोबत ‘चका चक’ गाण्यावर थिरकायचा मोह, पाहा त्यांच्या डान्सचा व्हिडिओ

‘तुझी सीमा पार करू नकोस’, अभिजीत बिचुकलेने किसची मागणी करता देवोलिनाने सुनावले खडेबोल

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार

 

 


Latest Post

error: Content is protected !!