Thursday, March 28, 2024

झी मराठी पुरस्कार सोहळ्यात इंद्रा, दिपूची जोडी करणार धमाकेदार डान्स, ऋताने शेअर केला सरावाचा व्हिडिओ

काही दिवसातच झी मराठीवर झी मराठी पुरस्कार सोहळा टेलिकास्ट होणार आहे. हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवरून अनेक कलाकाराचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. दररोज आपल्या भेटीला येणारे कलाकार रोजपेक्षा काहीतरी वेगळ्या पोशाखात दिसत असल्याने प्रेक्षकांना त्यांना बघताना देखील खूप आनंद होत आहे. त्यांचे हे फोटो, व्हिडिओ चांगलेच पसंत केले जात आहेत. अशातच आपल्या सगळ्यांची लाडकी दिपू आणि इंद्रा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. म्हणजेच महाराष्ट्राची क्रश ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत झी मराठी पुरस्कार सोहळ्यात ज्या गाण्यावर डान्स करणार आहेत, त्याचा सराव करताना एक व्हिडिओ समोर आला आहे.

ऋताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इंद्रा आणि दिपू ‘खंडेराया झाली माझी दैना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ते दोघेही ‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२१’ साठी डान्सची तयारी करत असून, ते दोघेही अत्यंत सुंदर डान्स करताना दिसत आहेत. हा सोहळा शनिवारी (३० ऑक्टोबर) टेलिव्हिजनवर टेलिकास्ट केला जाणार आहे. (hruta durgule share a practice dance video of zee marathi award function on social media)

त्यांचा हा व्हिडिओ पाहून सगळे त्यांना मंचावर या गाण्यावर डान्स करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत असून, तिच्या एका चाहत्याने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “या जोडीला कोणाची नजर नको लागायला.” तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

ऋता आणि अजिंक्य सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेची कहाणी काही वेगळी आणि प्रेममय असल्याने प्रेक्षकांना मालिका चांगलीच आवडली आहे. तसेच ऋता आणि अजिंक्यची केमिस्ट्री देखील सगळ्यांना खूप आवडत आहे. तसेच मालिकेचे शीर्षकगीत देखील मोठ्या संख्येने पसंत केले जात आहे.

ऋता ही टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. याआधी तिने ‘दुर्गा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम केले आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेतील तिचे वैदेही नावाचे पात्र खूप गाजले होते. तसेच ती लवकरच ‘अनन्या’ आणि ‘टाईमपास ३’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा