Friday, April 26, 2024

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिताने असं काय केलं की, बहीण शिल्पाही पडली तिच्या प्रेमात?

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये आजकाल शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यातील जवळीक वाढत चालल्याचे दिसत आहे. प्रत्येक गेलेल्या काळाबरोबर त्यांच्यातील बाँडिंग आणखी घट्ट होत आहे. तिचे कनेक्शन राकेशला नामांकनापासून वाचवण्यासाठी शमिताने आपल्या घरातून आलेली चिठ्ठी न वाचता फाडून टाकली आणि स्वतः घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट झाली. जेव्हा याची माहिती तिची बहीण शिल्पाला मिळाली, तेव्हा तिला तिच्या बहिणीचा अभिमान वाटला.

शमिता शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘बिग बॉस ओटीटी’चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राकेश बापटला वाचवण्यासाठी ती तिच्या घरातून आलेले पत्र त्याला देते आणि तिच्या घरून आलेलं पत्र ती न वाचता फाडताना दिसत आहे. यानंतर राकेश आणि शमिता दोघेही भावनिक झालेले दिसतात. बहिणीचे हे बलिदान पाहून शिल्पाला देखील तिच्यावर खूप प्रेम येते. शिल्पाने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन “टूंकी मला तुझा अभिमान आहे,” असे लिहिले.

बिग बॉस ओटीटीमध्ये २१ व्या दिवसाची सुरुवात खूप धमाकेदार होती. या आठवड्याच्या नॉमिनेटची सुरुवात एका रोचक वळणासह झाली. जोड्यांपैकी कोणीतरी एक सेव्ह होईल, ज्याला त्याच्या कुटुंबाकडून पाठवलेले पत्र वाचायला मिळेल. दुसरा नॉमिनेट झाल्यावर तो त्याच्या घरातून पाठवलेल्या पत्राचा त्याग करेल. या टास्कदरम्यान राकेश बापटला नॉमिनेटपासून वाचवण्यासाठी शमिता शेट्टीने तिच्या घरातून आलेले पत्र फाडले आणि स्वतः नॉमिनेट झाली.

पूर्वी जेव्हा राकेशने बिग बॉसच्या घरात शमिताचा मसाज केला होता, तेव्हा ही गोष्ट प्रचंड चर्चेचा विषय बनली होती. यासोबतच ‘इश्क वाला लव्ह’ या गाण्यावरील रोमँटिक डान्सने लोकांची मने जिंकली. त्याचबरोबर लोकांना या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आवडत आहे. एकदा शोमध्ये शमिता कुठल्यातरी गोष्टीवर रडताना दिसली होती, तेव्हा राकेशने तिला प्रेमाने मिठी मारली आणि तिला शांत केले. दोघेदेखील शोमध्ये एकमेकांना सपोर्ट करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

हे देखील वाचा