ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाट्यात आपली जोरदार कामगिरी करणाऱ्या किर्ती शिलेदार यांनी शनिवारी (२२ जानेवारी) जगाचा निरोप घेतला आहे. त्यांचे वय ७१ वर्ष होते. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याचवेळी त्यांना डायलिसिस असल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याचवेळी उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्युनंतर सर्व क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. रंगभूमीवरील जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या कीर्ती शिलेदार या कन्या होत्या. त्यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले आहे. कीर्ती शिलेदार यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले होते. (singer kirti shiledar death, lets know about her life)
संगीत ‘कान्होपात्रा’, ‘ययाती’, ‘देवयानी’, ‘संशय कल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘संगीत सौभद्र’, ‘मृच्छ कटिक’, ‘मंदोदरी’, ‘एकच प्याला’ यासारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते. अशाप्रकारे त्यांनी वयाची साठ वर्षे मराठी रंगभूमीसाठी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
पुणे विद्यापीठातून साहित्य शाखेच्या पदवी घेतलेल्या कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला.
हेही वाचा :
- इब्राहिम आईसोबत गाडीमध्ये स्पॉट झाली पलक तिवारी, पॅपराजींनी बघताच लपवले तोंड
- ‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली
- महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar