Tuesday, July 23, 2024

इब्राहिम अलीसोबत गाडीमध्ये स्पॉट झाली पलक तिवारी, पॅपराजींनी बघताच लपवले तोंड

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीच्या ग्लॅमरस लूकची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा पााहायला मिळत आहे. आपल्या बोल्ड आणि घायाळ करणाऱ्या अदांनी तिने सोशल मीडियाच तापमान चांगलच वाढवल आहे. कधी कधी आपल्या आईसोबतही अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र आता ती एका वेगळ्याच कारणाने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे, इतकेत नव्हेतर नेटकऱ्यांनी तीला जोरदार ट्रोलही केले आहे, नेमकं काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.

‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या तिच्या ‘बिजली’ या गाण्यामूळे सोशल मीडियावर कौतुकाचा विषय बनली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि आपले नवनविन फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. आई प्रमाणेच श्वेताच्या बोल्ड लूक्सने चाहत्यांना घायाळ केले आहे. नुकतीच ती सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानसोबत कारमध्ये फिरताना दिसली होती त्यामुळे दोघांमध्ये काय भानगड सुरू आहे असा प्रश्न आता चाहते विचारु लागले आहेत. (ibrahimm ali khan and palak tiwari spot together on dinner date actress hide her face)

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान एका गाडीत बसलेले दिसत आहेत. माध्यमांची नजर पडताच इब्राहिम खान हसताना दिसत आहे. मात्र पलक तिवारी कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी तोंड लपवताना दिसत आहे. हा समोर आलेला व्हिडिओ शुक्रवारी रात्रीचा असून सध्या सगळीकडे याची चर्चा होताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. शुक्रवारी दोघे डिनरसाठी गेले होते. अशी माहिताही समोर आली आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी आता दोघांमध्ये काय चालंलयं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर व्हिडिओमध्ये तोंड लपवणाऱ्या पलकला काही नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केले आहे.

पलक आणि इब्राहिमच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने पलकला ट्रोल करताना “तोंड लपवायची काय गरज होती,” असा प्रश्न केला आहे, तर आणखी एकाने “तोंड लपवलयं आता आई ओरडणार नाही,” अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी आईसारखी नाटकी आहे म्हणत तिला ट्रोल केले आहे. आणखी एकाने तिला “तोंड का लपवतेस रेड पडली आहे का?” असे म्हणत ट्रोल केले आहे.

हेही वाचा :

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

महाराष्ट्राची कन्या बनली हैदराबादची सून, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची अनोखी लव्हस्टोरी | HBD Namrata Shirodkar

नोरा फतेही आणि टेरेन्स लुईसची सिझलिंग केमेस्ट्री, व्हिडिओने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

 

हे देखील वाचा