Monday, July 15, 2024

‘मेला’ चित्रपटातील फैजल खान आठवतो का? पाहून ओळखणे देखील होईल कठीण

आमिर खान हा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा चित्रपट पडद्यावर येताच खळबळ उडवून देतो. इंडस्ट्रीतील बाकी कलाकारांचे कुटुंबीय ज्या पद्धतीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवतात, त्याच पद्धतीने आमिर खानचा भाऊ फैजल खान यानेही इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, बहुतेक चित्रपट आमिर आणि फैजलचे एकत्र आहेत, पण फैजलची ओळख ‘मेला’ हा चित्रपट आहे, या चित्रपटातील व्यक्तिरेखेने त्याने लोकांची मने जिंकली होती. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन 22 वर्षे झाली आहेत. आमिरचा भाऊ फैजलचा लूक पूर्णपणे बदलला आहे.

अलीकडे फैजलचे  (faijal kha) काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये त्याला ओळखणे खूप कठीण आहे.  फैजलचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. त्याचे लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांना तो फैजल आहे यावर विश्वास बसत नाहीये. एका चाहत्याने लिहिले आहे की, “तुम्ही तेच शंकर आहात यावर विश्वास बसत नाही. तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले तुझा संपूर्ण लुक बदलला आहे.”

फैजलने 1969 पासून ‘प्यार का मौसम से’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो आमिर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’मध्ये दिसला. फिल्मी दुनियेतील त्यांची कारकीर्द काही खास नव्हती.

आमिर खानने आपला भाऊ फैजल खानला ‘मेला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला. फैजलने काही वर्षे आमिरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये स्क्रिप्ट रायटर म्हणूनही काम केले आहे, पण नंतर या भावांच्या नात्यात दुरावा आला आणि फैजलने आमिरवर अनेक आरोप लावले. परंतु आता हे दोन्ही भाऊ आपापल्या मार्गावर आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा