जान्हवीने ‘भैया’ म्हणून हाक मारल्यावर अर्जुन कपूरला आजही वाटते विचित्र; मुलाखतीत स्वत: सांगितली मनातली गोष्ट


हिंदी सिनेसृष्टीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, या क्षेत्रात अनेक घराण्यातील लोकं इथे वावरताना आपल्याला दिसतात. भाऊ बहिणीपासून, काका पुतणे, मामा भाचे ते अगदी सावत्र बहीण भावांपर्यंत अशा अनेक नात्यातील ही मंडळी इथे सापडतात. काही लोकांचे नाते अतिशय सुंदर असते तर काहींचे एकमेकांशी बिलकुल पटत नाही. अशीच या इंडस्ट्रीतील एक कुटुंब म्हणजे कपूर कुटुंब. अनिल कपूर, बोनी कपूर आणि संजय कपूर या तिघं भावांनी या क्षेत्रात त्यांचे नाव तयार केले आहे. आता त्यांच्या पुढची पिढी अभिनयात आली असून, ते देखील घराण्याचा वारसा पुढे नेत आहे.

यांच्या पुढच्या पिढीतील अभिनेता म्हणजे अर्जुन कपूर. आज अर्जुन आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या अभिनयाने फॅन्सच्या मनात स्वतःचे नाव कोरले आहे. अर्जुनाची सावत्र बहीण आहे जान्हवी कपूर. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लेक जान्हवी सध्या अभिनयात तिचे स्थान निर्माण करत आहे. सुरुवातीच्या काळात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर यांचे नाते एवढे खास नव्हते. मात्र २०१८ साली अचानक झालेल्या श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर त्याच्या बहिणींच्या खूप जवळ आला आहे.

एका मुलाखतीदरम्यान त्याने त्याच्या आणि जान्हवीच्या बॉंडिंगवर भाष्य केले आहे. तो म्हणाला की, जेव्हा जान्हवी त्याला भैया म्हणते तेव्हा त्याला हे ऐकायला खूप विचित्र वाटते. तो म्हणाला की, त्याला फक्त अंशुलाच भाई म्हणते. जेव्हा तो जान्हवीच्या तोंडून अर्जुन भैया ऐकतो, तेव्हा त्याला खूपच नवीन काहीतरी ऐकल्यासारखे वाटते. त्याच्या मते जान्हवीच्या तोंडून त्याला पाहिल्यावर आपोआपच अर्जुन भैया हा शब्द निघत असेल. त्याने कधीच जान्हवीला सांगितले नाही की, त्याला भाऊ म्हण किंवा दुसऱ्या कोणत्या नावाने हाक मार.

मीडियातील बातम्यांनुसार जेव्हा बोनी कपूर यांनी अर्जुनच्या आईला सोडून श्रीदेवी यांच्याशी लग्न केले होते, तेव्हा सर्वात जास्त अर्जुनच चिडला होता. तो म्हणाला होता की, तो जान्हवी आणि खुशीला त्याची बहीण मानत नाही. त्या दोघींशी त्याचे कोणतेही नाते नाहीये. त्याच्यासाठी हे नाते कधीच महत्वाचे नव्हते.

अर्जुनला कधीच श्रीदेवी आवडल्या नाही. तो म्हणाला होता की, श्रीदेवी ह्या फक्त त्याच्या वडिलांच्या पत्नी आहे. त्याच्या कोणी नाही. अर्जुन हा बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. अर्जुनची अंशुला नावाची एक बहीण देखील आहे. १९९६ साली बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्याशी लग्न केले होते. या गोष्टीमुळे मोना कपूर खूप दुखी झाल्या होत्या.

मात्र २०१८ साली श्रीदेवीच्या निधनानंतर अर्जुनने त्याच्या दोन्ही सावत्र बहिणींना स्वीकारले आणि त्या कठीण प्रसंगात त्यांच्यासोबत उभा राहिला. अर्जुन म्हणाला होता की, “मला माहित आहे आई जाण्याचे दुःख. जान्हवी आणि ख़ुशी या दोघींना खूप कमी वयात हे दुःख सहन करावे लागत आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हनुमाना’च्या भूमिकेने मिळवली होती तुफान लोकप्रियता; तर दारा सिंग यांच्यासोबत काम करताना घाबरायच्या अभिनेत्री

-सारा अली खानने दिली कामाख्या देवीच्या मंदिराला भेट; फोटो पाहून युजर्सने पाडला धर्मावरून प्रश्नांचा पाऊस

-वाचा हिंदी चित्रपटांमध्ये ‘प्राण’ टाकणाऱ्या अभिनेत्याची कहाणी; खलनायकी साकारून नायकालाही दिलीय त्यांनी टक्कर


Leave A Reply

Your email address will not be published.