Tuesday, September 26, 2023

दु:खद: ‘कटप्पा’वर दु:खाचा डोंगर! अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा

बाहुबली‘ सिनेमातून प्रसिद्धीचे शिखर गाठणारे ‘कटप्पा‘ म्हणजेच अभिनेते सत्यराज यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते सत्यराज यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 94व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे अभिनेत्याच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवले आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, अभिनेते सत्यराज यांची आई नाथम्बल यांचे शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) निधन झाले. त्यांनी कोईम्बतुर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. असे म्हटले जात आहे की, नाथम्बल यांचे निधन वाढत्या वयाच्या आजारामुळे झाले आहे. त्यांच्या निधनावर साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारही हळहळले आहेत.

कमल हासन यांनी व्यक्त केला शोक
सत्यराज यांच्या आईच्या निधनावर साऊथ इंडस्ट्रीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. दिग्गज अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) आणि निर्माता, अभिनेता उधयनिधी स्टॅलिन यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी ट्वीट करत सत्यराज यांच्या आईला श्रद्धांजली अर्पण केली.

कोईम्बतुरमध्ये होणार अंतिम संस्कार
अभिनेते सत्यराज (Sathyaraj) यांना आईच्या निधनाची सूचना मिळताच त्यांनी शूटिंग रोखली. तसेच, ते कोईम्बतुरला रवाना झाले. खरं तर, सत्यराज आपल्या एका आगामी सिनेमाचे हैदराबाद येथे शूटिंग करत होते. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या आईवर कोईम्बतुर येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

आईच्या जवळ होते सत्यराज
खरं तर, नाथम्बल यांना तीन अपत्य आहेत. त्यात अभिनेते सत्यराज, आणि दोन मुली कल्पना आणि रुपा आहेत. सत्यराज हे त्यांच्या आईच्या खूपच जवळ होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आईला त्यांचे सिनेमे पाहायला खूप आवडायचे.

सत्यराज हे साऊथ इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव आहे. त्यांनी ‘बाहुबली’ सिनेमात ‘कटप्पा’ (Katappa) हे पात्र साकारले होते. त्यांच्या या पात्रामुळे त्यांना जगभरात ओळख मिळाली. (south actor sathyaraj mother nathambal kalingarayar passes away read here)

महत्त्वाच्या बातम्या-
शाहरुखच्या लेकीने कृतीतून जिंकले मन! भीक मागायला आलेल्या महिलेला मोठ्या मनाने दिले ‘एवढे’ रुपये, Video Viral
एका सिनेमासाठी घेते कोटी मानधन, पण फक्त 1600 रुपयांसाठी आईवर संतापलेली ‘ही’ अभिनेत्री, कारण धक्कादायक

हे देखील वाचा