जेवताना जेमी लिव्हरला लागली मिर्ची; दिले असे एक्सप्रेशन्स की, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट


बॉलिवूडमध्ये किंवा बॉलिवूडबाहेर कॉमेडीसाठी बेस्ट कोण? असा प्रश्न कोणीही विचारला तरी डोक्यात एकच नाव येते ते म्हणजे जॉनी लिव्हर. जॉनी लिव्हर हे त्यांच्या कॉमेडीने अनेक दशकांपासून रसिकांचे मनोरंजन करत आले आहेत. कॉमेडी असो की मिमिक्री या दोन्ही गोष्टींमध्ये कदाचित त्यांचा हात धरणारा अजून कोणी आलाच नाही. मात्र, जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कॉमेडीच्या क्षेत्रात नशीब आजमावत आहे.

वडिलांप्रमाणे जेमी देखील कॉमेडी आणि मिमिक्रीमध्ये प्रतिभावान आहे. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर कॉमेडीच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. सोशल मीडियावरही जेमीला लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमी तिचे वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ टाकतच असते. तिचे हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात.

नुकताच जेमीजा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेवण करत असताना तिने चुकून मिरची खाल्ली आणि त्यावर तिने जबरदस्त एक्सप्रेशन्स देत फॅन्सचे मन जिंकले आहे. जेमीने तिच्या फॅन्ससोबत वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियावर डिनर आयोजित केला होता. यावेळी खात असताना तिला मिरची लागली आणि यावर तिने तिच्या हटके स्टाईलमध्ये भन्नाट एक्सप्रेशन्स दिले आहे. तिचे हे एक्सप्रेशन्स पाहून बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिला ‘एक्सप्रेशन क्वीन’ संबोधले आहे. तसेच काहींनी लिहिले की, “तुम्ही निर्जीव व्हिडिओमध्ये देखील जीव आणतात.” जेमीला आता तिचे फॅन्स चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे. जेमीचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात असून आतापर्यंत या व्हिडिओला २ मिलिअनपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत.

नुकताच जेमीने तिचे भारतीय पोशाखातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले. जेमीला या अवतारात पाहणे तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्काच होता.

विशेष म्हणजे जेमीने चित्रपटातही काम केले आहे. तिने ‘किस किसको प्यार करू’, ‘हाऊसफुल ४’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-संजू बाबाची पत्नी वयाच्या ४२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ केला शेअर

-‘आई शानदार असते!’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस

-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त


Leave A Reply

Your email address will not be published.