लग्नाच्या नुसत्या नावाने देखील चिडायची काजोल, मात्र अजयला भेटल्यानंतर बदलले विचार, वाचा त्यांची प्रेमकहाणी

बॉलिवूडमध्ये नाते टिकत नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र अशा लोकांच्या विचारांना आणि अशा समजांना चुकीचे ठरवत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे लग्न फक्त टिकवले नाही तर ते यशस्वी देखील करून दाखवले. अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी आजच्या पिढीपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. यातलीच एक अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी म्हणजे, अजय देवगण आणि काजोल. अजय आणि काजोल हे बॉलिवूडमधील एक आदर्श जोडपे असून त्यांनी कपल गोल्स तयार केले आहे. हे दोघे उत्तम कलाकार असण्यासोबतच उत्तम आईवडील आणि उत्तम पतिपत्नी देखील आहेत.

मात्र त्यांच्या लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर काजोलने लग्नाबद्दल एक खुलासा केला आहे. काजोलने अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये हजेरी लावत लग्नाबद्दल तिचे विचार, मत मांडले. यादरम्यानच तिने सांगितले की, तिला कधी लग्नच करायचे नव्हते. नुसत्या लग्नाच्या नावाने ती चिडायची मात्र जेव्हा ती अजयला भेटली त्यानंतर ती त्याच्या व्यक्तिमत्वाने आणि त्याच्या स्वभावाने इंप्रेस झाली, आणि लग्नाबद्दलचे तिचे विचार बदलले. पुढे ती म्हणाली की, “मी त्या लोकांपैकी एक होती, ज्यांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन लग्न लावले जाईल किंवा म्हटले जाईल की, लग्न कर नाही तर तुझे डोके उडवून देऊ.”

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

पुढे काजोल म्हणाली की, “जेव्हा मी अजयला भेटली तेव्हा त्याच्या विचारांनी माझ्यात स्थिरता आली. तो खूपच जमिनीवर पाय ठेऊन जगणारा व्यक्ती आहे. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास असून, त्यानेच मला अनेक गोष्टींबाबत एक वेगळी नजर दिली. मला हे देखील माहित आहे, की तो मला कधीच सोडणार नाही आणि मी देखील त्याला कधी सोडणार नाही. माझे सौभाग्य आहे की, मला आयुष्याच्या योग्य वळणावर योग्य व्यक्ती मिळाला.”

काजोल आणि अजय देवगण यांची पहिली भेट ‘हलचल’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. काजोल आणि अजय यांचे प्रेम पहिल्याच भेटीत झाले असे नाही. पहिल्या भेटीत काजोलला अजयबद्दल अनेक गैरसमज झाले होते. मात्र हळूहळू तिला तो समजल्यानंतर त्यांनी डेट करायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी १९९९ साली लग्न केले. या दोघांनी ‘इश्क’, ‘प्यार तो होना ही था’, ‘राजू चाचा’, ‘यू, मी और हम’ ‘तान्हाजी’ आदी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांना ‘न्यासा’ आणि ‘युग’ नावाची दोन मुलं देखील आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post