Sunday, May 24, 2026
Home बॉलीवूड कपिल शर्माने मुलगी अनायराचे सुंदर आणि क्युट फोटो शेअर करत सर्वांना दिल्या कन्यादिनाच्या शुभेच्छा

कपिल शर्माने मुलगी अनायराचे सुंदर आणि क्युट फोटो शेअर करत सर्वांना दिल्या कन्यादिनाच्या शुभेच्छा

प्रत्येक वर्षी २६ सप्टेंबर जागतिक कन्यादिन साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिवस उत्साहाने साजरा होत आहे. कलाकारांनी देखील त्यांच्या मुलींचे फोटो शेअर करत कान्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच त्याच्या अनोख्या अंदाजने लोकांना हसवत असतो. कन्यादिनाचे औचित्य साधत कपिल शर्माने देखील मुलगी अनायरा शर्माचे फोटो शेअर करून चाहत्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कपिलने इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मुलीचे तीन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत आणि आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. या फोटोंवर ५ हजारांहून अधिक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

कपिलने शेअर केलेल्या या तीन फोटोंपैकी एकामध्ये अनायरा पिवळ्या रंगाच्या घागरा चोलीमध्ये दिसत आहे. या दरम्यान, अनायरा कॅमेरासमोर अतिशय गोंडस पद्धतीने पोझ दिली आहे. त्याचवेळी, कपिलच्या शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोत अनायरा लाल आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सनग्लासेस घालून पूलशेजारी उभी दिसते. अनायराचा तिसरा आणि शेवटचा फोटो देखील खूप क्यूट आहे. ज्यात ती हसत गार्डनमधील लाकडी बाकवर बसलेली दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कन्यादिनाच्या शुभेच्छा” कपिल शर्माच्या मुलीची हे सुंदर फोटो पाहिल्यानंतर चाहतेही त्याच्या मुलीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना लिहिले की, ‘शानदार’, दुसऱ्याने प्रतिक्रिया करताना लिहिले की, “क्यूट, देवाचे आशीर्वाद” अनेक नेटकऱ्यांनी इमोजीद्वारे अनायरासाठी खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले आहेत.

कपिलने शेअर केलेल्या मुलीच्या या फोटोंवर केवळ चाहतेच नाही, तर अनेक कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. करणवीर बोहराने कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. अहाना कुमराने लिहिले, “तुझी मुलगी खूपच क्यूट आहे” तर भारती सिंगने लिहिले की, ‘रब्बा’, नेहा कक्करने लिहिले की, “किती सुंदर आहे कोणाची दृष्ट न लागो.”

कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांनी डिसेंबर २०१९ मध्ये त्यांच्या मुलीचे स्वागत केले. अनायरा शर्मा व्यतिरिक्त, दोघांना एक मुलगा आहे. ज्याचा जन्म या वर्षाच्या सुरुवातीला झाला. फादर्स डेच्या निमित्ताने कपिल शर्माने पहिल्यांदाच आपल्या दोन मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

यावेळी कपिल ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनमध्ये तो खूप मस्ती घेऊन परतला आहे. कपिल शर्मा, अर्चना पूरन सिंह कृष्णा, भारती आणि चंदन शोमध्ये राहिले असताना, सुमोनाचा एक नवीन अवतार दिसला आणि सुदेश लहरी देखील या टीमचा एक भाग आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा