Thursday, July 18, 2024

करण जोहरने स्वतः नाही पाहिला ‘कभी खुशी कभी गम’, 25 वर्षे झाल्यावर पुन्हा चित्रपट करणार रिलीझ

बॉलीवुडचा प्रसिध्द दिगदर्शक आणि निर्माता करण जोहर (karan Johar) याने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडसाठी तयार केले आहेत. त्याने चित्रपट पुन्हा रिलीज करण्याच्या कल्पनेवर आनंद व्यक्त करत आपणही कभी खूशी कभी गम २५ पुर्ण झाले की रिलीज करू अशी माहिती दिली.

करण जोहर बॉलिवूडचा प्रसिध्द दिगदर्शक आणि निर्माता कॉस्ट्यूम डिजाइनर, अभिनेता आणि सुत्रसंचाक म्हणून आोळखला जातो. करण ने’कुछ कुछ होता है’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ असे अनेक सुपर हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. १४ डिसेंबर २००१ ला रिलीज झाला होता.

२००१ साली रिलीज झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ ब्लाॅकबास्टर फिल्म मधील एक फिल्म हाेती.शाहरुख खान, ऋतिक रोशन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, काजोल, करीना कपूर आणि राणि मुखर्जी अशी दमदार स्टार कास्ट या सिनेमासाठी निवडली गेली होती. या सेनेमाच्या कथेपासुन ते गाण्यापर्यंत सगळं सुपरहिट ठरलं आहे.

आताच काही दिवसापुर्वी जोया अख्तरची ‘रॉकस्टार’ फिल्म सिनेमागृहात रिलीज करण्यात आली ही कल्पना करण जोहर खूप पसंत पडली आहे. मिडीयारिपोर्ट्स नुसार ‘बैड न्युज’ ट्रेलर लॅांच च्या वेळी करण जाेहर म्हणाला “मी २३ वर्षात हा सिनेमा बघितला नाही आहे पण या वर तयार होणारे रील मी नेहमी बघतो जेव्हा या सिनेमाला २५ वर्ष पुर्ण होतील (२०२६) तेव्हा हा सिनेमा मी सिनेमागृहात प्रदर्शित करणार आहे .खूप लोक आहेत जे या सिनेमाला बघत मोठे झाले आणि हा सिनेमा पुन्हा रिलीज करण त्याच्यसाठी आठवणीतल ठरेल.

रोमांटिक कॉमेडी फिल्म ‘बॅड न्यूज’ चे दिगदर्शन आनंद तिवारी यांनी केलं आहेआणि याचा निर्माता करण जोहर ची कंपनी धर्मा प्रोड्क्शन ही आहे.या सिनेमात तृप्ति डिमरी, विक्की कौशल आणि एमी विर्क मुख्य भुमिकेत पाहिला मिळणार आहेत.हा सिनेमा १९ जुलै २०२४ला सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचे असेल तर अभिनयाकडे वळू नका,’ मनीषा कोईरालाने सांगितला यशाचा मंत्र
टायगर श्रॉफला या दोन चित्रपटांसाठी मिळाले 165 कोटी रुपये! निर्मात्याने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा