कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाला सलमान खानचे आई-वडील ‘या’ कारणामुळे राहणार अनुपस्थित


लवकरच कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या शाही लग्नासाठी बॉलिवूड, उद्योग आणि इतर विविध क्षेत्रातून अनेक व्हीव्हीआयपी पाहुणे या लग्नाला हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडमधील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे लग्न असल्याचे म्हटले जात आहे आहे. या लग्नाला अनेकांना आमंत्रण आहे, यातलेच एक मुख्य नाव म्हणजे सलमान खान आणि त्याचे कुटुंबीय देखील लग्नासाठी आमंत्रित आहे. सलमान आणि कॅटरिना काही काळ रिलेशनशिपमध्ये होते, मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतरही ते चांगले मित्र आहेत. अनेक हिट सिनेमे या जोडीने दिले आहेत.

संपूर्ण लोकांचे आणि मीडियाचे लक्ष एकाच गोष्टीकडे होते आणि ती म्हणजे सलमान या लग्नाला येणार की, नाही? मात्र सलमान त्याच्या DA-Bangg या टूरच्या निमित्ताने सौदी अरबमध्ये असल्याने तो या लग्नाला हजर नसेल, मात्र त्याच्या आई-वडिलांनी तरी लग्नाला यावे अशी कॅटरिनाची खूप इच्छा होती. मात्र आता मिळत असलेल्या माहिती नुसार ते देखील लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही.

कॅटरिनाला या क्षेत्रात सुरुवातीला अपयशच मिळाले. मात्र तिला या क्षेत्रात स्थिरावण्यासाठी आणि तिला चांगले सिनेमे मिळवून देण्यासाठी सलमान खानने खूप प्रयत्न केले. तिच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा सलमानचा असल्याचे सर्वानाच माहित आहे. कॅटरिना आणि सलमान खानचे कुटुंबीय, त्याचे आई-वडील यांच्यात खूपच जवळचे नाते आहे. त्यासाठी कॅटरिनाची इच्छा होती की, सलमान खानच्या आई- वडिलांनी तरी तिला आशीर्वाद द्यायला यावे. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव ते या लग्नाला हजर राहणार नसल्याचे समजत आहे. या लग्नाला अनेक दिग्गज हजेरी लावणार असून, यात करण जोहर, फराह खान, नेहा धुपिया, अंगद बेदी आदी अनेक कलाकारांचा समावेश आहे.

कॅटरिना आणि विकी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधल्या सिक्स सेन्स फोर्ट सवाई माधेपूर येथे विवाह करणार आहे. आता त्यांच्या लग्नाच्या आधीच्या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली असून हा लग्न सोहळा अतिशय खासगी स्वरूपाचा असणार आहे.


Latest Post

error: Content is protected !!