Thursday, July 18, 2024

घरी परतल्यानंतर विकी कौशलला नव्हे, तर ‘या’ व्यक्तीला मिस करतेय कॅटरिना, शेअर केले क्लोज फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) तिचा पती विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) क्वालिटी टाइम घालवून घरी परतली आहे. घरी परतल्यानंतर कॅटरिना एका खास व्यक्तीला मिस करत आहे, पण तो व्यक्ती पती विकी कौशल नसून, दुसरं कोणीतरी आहे. कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्या खास व्यक्तीचे बरेच फोटो शेअर केले आणि फोटोंसोबत लिहिले की ‘मला तुझी आठवण येते’.

खरं तर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफरने काल त्याचा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी कॅटरिना कैफने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही न पाहिलेले फोटो शेअर केले. हे फोटो वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंग दरम्यानचे आहेत, ज्यात कॅटरिना अली अब्बासला त्रास देताना दिसत आहे. (katrina kaif missing director ali abbas zafar not vicky kaushal after returning from indore)

एका फोटोमध्ये अभिनेत्री डायरेक्टरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे, हा फोटो ‘मेरे ब्रदर की दुल्हन’च्या शूटिंगदरम्यान घेण्यात आला आहे. या फोटोसोबत कॅटरिनाने “प्रिय मित्रा… आज तुझा वाढदिवस आहे” असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये कॅटरिना अली अब्बाससोबत सेल्फी घेताना दिसत आहे, या फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिले आहे, “मला तुझी आठवण येते.” बाकी फोटोमध्ये कॅटरिना डायरेक्टरसोबत ‘टायगर जिंदा है’चे शूटिंग करताना दिसत आहे. कॅटरिना आणि अलीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

कॅटरिनाने अली अब्बास जफर दिग्दर्शित तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते तीन चित्रपट म्हणजे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘भारत’ आणि ‘टायगर जिंदा है’. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर कॅटरिना नुकतीच पती विकी कौशलसोबत इंदूरहून परतली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा