×

‘इथले सगळेच करामती, लका आपली बारामती’, यूट्युबवर धुमाकूळ घालतंय हे गाणं

सोशल मीडिया हे माध्यम अनेक प्रतिभावान लोकांसाठी एक अतिशय उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. अशीच प्रतिभावान मंंडळी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या प्रतिभा अवघ्या जगासमोर सादर करताना दिसतात. सध्याच्या युगात सोशल मीडियाचा प्रचंड वापर केला जात आहे. प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जाते. सोशल मीडियाच्या जमान्यात रोज काही ना काही व्हायरल होत आहे. अशातच बारामतीच्या एका रॅपरचं गाणं युट्यूबवर धुमाकूळ घालताना दिसतंय.

अक्षय कबीर असं या रॅपरचं नाव आहे. जगाला बारामतीची ओळख करून देत, त्याने एक अतिशय भन्नाट रॅप तयार केलं आहे. कबीरच्या या रॅप सॉंगचं नाव आहे, ‘काय लका’. बारामती शहराची खासियत तो या व्हिडिओमधून प्रेक्षकांना सांगताना दिसत आहे. बारामतीकरांनी तर या व्हिडिओला डोक्यावर उचलून घेतलंच आहे, पण बारामतीच्या सीमा ओलांडतही या गाण्याने सर्वांना वेड लावलं आहे.

‘काय लका’ गाणं स्वत: अक्षय कबीरने लिहिलं आहे. अवघ्या २ मिनिटे, ४८ सेकंदाच्या या रॅप सॉंगने सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधलं आहे. ९ मार्चला रिलीझ झालेल्या या गाण्याला आतापर्यंत हजारो व्यूव्ह्ज मिळाले आहेत. तर प्रेक्षकांची मने जिंकत हजारोच्या संख्येने लाईक्सही या व्हिडिओवर पाहायला मिळत आहे.

बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. शरद पवार यांची जन्मभूमी काटेवाडी हे गाव बारामती जवळ आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

Latest Post