Wednesday, March 27, 2024

‘केजीएफ २’साठी सुपरस्टार यशने घेतले तब्बल ‘इतक्या’ कोटींचे मानधन, आकडा ऐकून नक्कीच होती डोळे पांढरे

सध्या देशभरातील चित्रपटगृहांमध्ये ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करायला सुरूवात केली आहे. याआधी आलेल्या केजीएफ १ चित्रपटालाही प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच सर्वांना या चित्रपटाची आतुरता लागली होती. सुपरस्टार यशच्या (Yash) दमदार अभिनयाचेही सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. पाहूया या सुपरहिट चित्रपटाबद्दलच्या माहिती नसलेल्या रंजक कथा. 

दिग्दर्शक प्रशांत नील दिग्दर्शित ‘केजीएफ चॅप्टर २’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपटात सुपरस्टार यश आहे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, केजीएफ चॅप्टर २ ची क्रेझ लोकांच्या डोक्यात आहे, त्यामुळेच या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत ५०० कोटींची कमाई केली आहे. या एक्शन चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये रिलीज झाला होता आणि तेव्हापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘केजीएफ’ चित्रपटानंतर यशच्या लोकप्रियतेचा आलेख वाढू लागला. यशला खरी ओळख केजीएफ रिलीज झाल्यानंतरच मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यश सध्या साऊथ सिनेमातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक आहे.

सुपरस्टार यश एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे यशने केजीएफ चॅप्टर २ साठी २७ कोटी इतकी मोठी फी घेतली आहे.यश एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे आणि त्याचे वडील कर्नाटक स्टेट रोडवेज बस चालवायचे. यशच्या कुटुंबीयांची इच्छा होती की त्याने शिक्षण घेऊन नोकरी करावी, पण यशला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. यामुळेच कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध यशने ग्लॅमरचे क्षेत्र निवडले आणि आज त्याची गणना इंडस्ट्रीतील बड्या स्टार्समध्ये केली जाते. केजीएफ चॅप्टर २’ मध्ये यशसोबत रवीना टंडन, संजय दत्त आणि प्रकाश राज देखील मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा