अर्जुन बिजलानी अन् विशाल आदित्य सिंगने केला ‘पहला नशा’ गाण्यावर रोमान्स; पाहा त्यांचा रोमँटिक व्हिडिओ


टेलिव्हिजन क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर रियॅलिटी शो दाखवले जातात. टेलिकास्ट होणारा प्रत्येक शो हा इतर शोपेक्षा कसा वेगळा असेल हे सर्व निर्माता, दिग्दर्शक नेहमी बघतात. असाच एक रियॅलिटी शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी’ होय. मागील अनेक वर्षांपासून हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतर अनेक रियॅलिटी शोपेक्षा हा शो नक्कीच वेगळा आहे. या शोमध्ये सहभागी होणारे सर्वच स्पर्धक विविध स्टंट्स करत आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.

आजपर्यंत या शोचे अनेक सिझन आले आणि प्रत्येक सिझनने मागच्या सिझनपेक्षा अधिकच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शो सुरू झाल्यानंतर नेहमी टीआरपीच्या रेसमध्ये टॉप फाइव्हमध्ये असतो. कलाकार त्यांच्या भीतीदायक स्टंट्स आणि रोहित शेट्टीचे खुमासदार सूत्रसंचालन यामुळे हा शो नेहमी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. स्पर्धक नेहमी स्टंट्सच्या दरम्यान वेगवेगळे पद्धतीने स्वतःचे आणि इतरांचे मनोरंजन करताना दिसतात.

लवकरच खतरों के खिलाडी ११ हे सुरू होणार आहे. त्याआधीच या शोचे अनेक छोटे छोटे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेच. असाच एक व्हिडिओ कलर्स चॅनेलने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून हा व्हिडिओ खूपच कमी काळात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्य सिंग एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसत आहे. सोबतच ‘पहला नशा पहला खुमार’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. इतर स्पर्धक जोरजोरात हसताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ शेअर करताना कलर्स टीव्हीने लिहिले की, “नवीन प्रेम, खूप सारी मस्ती आणि भिती.” हा शो येत्या १७ जुलैपासून सुरू होत आहे. या पर्वात श्वेता तिवारी, दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्ला, राहुल वैद्य, निक्की तांबोळी, आस्था गिल, अर्जुन बिजलानी, वरुण सूद, सौरभ राज जैन, विशाल आदित्य सिंग, अनुष्का सेन, महेक चहल आणि सना मकबुल हे स्पर्धक सहभागी होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.