Sunday, December 8, 2024
Home भोजपूरी खेसारी लालच्या ‘बिजुरिया’ गाण्याने केवळ तीन दिवसात मिळवले तीन मिलियन व्ह्यूज

खेसारी लालच्या ‘बिजुरिया’ गाण्याने केवळ तीन दिवसात मिळवले तीन मिलियन व्ह्यूज

भोजपुरी इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता खेसारी लाल यादव हा त्याच्या फॅन्सच्या मनावर राज्य करतो. खेसारी लालची गाणी प्रदर्शित होताच सुपरहिट ठरतात. त्याच्या फॅन्सला आणि भोजपुरी गाण्यांच्या चाहत्यांना नेहमीच खेसारी लालच्या गाण्यांची प्रतीक्षा असते. भोजपुरी गाण्यांमध्ये लाऊड म्युझिक, लक्षात राहणारी धून, जबरदस्त डान्स स्टेप्स, हटके शब्द आदी अनेक कारणांमुळे भोजपुरी गाणी सुपरहिट ठरतात. ही गाणी ऐकल्यावर लगेच लोकं नाचायला सुरुवात करतात अशी असतात. सुपरस्टार खेसारी लालचे एक नवीन गाणे प्रदर्शित झाले असून, या गाण्याने प्रदर्शनानंतर लगेच धमाका केला आहे.

खेसारी लालचे हे नवीन गाणे प्रदर्शनानंतर काही काळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. या गाण्यात  त्याच्यासोबत अभिनेत्री सपना चौहान असून, गाण्याचे बोल ‘बिजुरिया’ असे आहे. खेसारी लालने त्याचे हे गाणे SRK म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळवली असून, गाणे दर्शकांना चांगलेच आवडत आहे. यासोबतच सोहळा मीडियावरही गाण्याचा बोलबाला दिसून येत आहे. या गाण्याने केवळ तीनच दिवसात ३.३ मिलियन व्ह्यूज मिळवले. सपना आणि खेसारी लाल यांच्यातल्या केमेस्ट्रीने देखील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

केवळ तीन दिवसात ‘बिजुरिया’ गाण्याने तुफान प्रेम मिळवले आहे. कमेंट्समध्ये दर्शक खेसारी, सपना यांचे कौतुक करत त्यांना गाणे आवडल्याचे सांगत आहे. हे गाणे खेसारी लाल आणि कल्पना यांनी गेले असून, अर्जुन आदित्य यादवने लिहिले आहे. खेसारी लालच्या इतर गाण्यांप्रमाणे हे गाणे देखील सुपरहिट होणार यात शंका नाही. अजून काही दिवसातच गाणे १० मिलियनचा टप्पा ओलांडेल असे सांगितले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा