‘कुसुम’ फेम अभिनेेता अनुज सक्सेनावर १४१ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, मुंबई पोलिसांकडून अटक


काही कलाकार असे असतात, जे त्यांच्या अनोख्या कामगिरीसाठी ओळखले जातात. पण काही कलाकार असेही असतात, जे कामगिरीमुळे नाही, तर वेगळ्याच कारणामुळे ओळखले जातात. त्यांना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडतानाही आपण पाहिले आहे. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी सगळीकडे झाली आहे. ‘कुसुम’, ‘रिश्ते की दोर’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ अशा मालिकांमध्ये दिसणारा अभिनेता अनुज सक्सेनाला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १४१ कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने एका प्रकरणात पोलिसांकडून अनुज सक्सेनाची कस्टडी मागितली आहे.

त्यांनी कोर्टाला सांगितले आहे की, अनुज सक्सेनावर फार्मा कंपनीचा सीईओ म्हणून १४१कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. मात्र, अनुज सक्सेनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याने म्हटले आहे की, त्यांची कंपनी सॅनिटायझर्स आणि किट बनवते. त्यांची गरज कोरोना साथीच्या वेळी आहे.

वृत्तानुसार अनुज सक्सेना यांच्यावर फसवणूकीचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपात असे म्हटले जाते की, २०१२ मध्ये अनुज सक्सेनाने गुंतवणुकदारांना सांगितले होते की, जर त्यांनी आपल्या कंपनीत पैसे गुंतवले, तर त्याचा फायदा होईल.

सन २०१५ मध्ये जेव्हा गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी केली, तेव्हा त्यांना ते पैसे मिळाले नाहीत. त्यांचे पैसे लवकरच परत मिळतील, असे लेखी आश्वासन त्याला प्राप्त झाले होते. न्यायाधीश अभिजीत नांदगावकर म्हणाले की, अनुज सक्सेना यांचे कंपनीत मोठे पद आहे. सीओओ असल्याने, त्यांना आर्थिक व्यवहार, आणि अनियमिततेची जाणीव असेल.

यामुळे त्यांनी अनुज सक्सेना यांना, सोमवारपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या कस्टडीमध्ये पाठविले आहे. अनुज सक्सेना एक टीव्ही कलाकार आहे. तो अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे. त्याच्या भूमिकांना चांगलीच पसंती मिळाली आहे. अनुज सक्सेनाची अटक ही, त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोनापुढे अभिनेत्री असहाय्य! वडिलांच्या मृत्यूनंतर आता हिना खानने आईसाठी लिहिली भावुक पोस्ट, म्हणाली…

-‘तू वनराजचा पिच्छा का सोडत नाहीये?’ मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

-पंजाबवरून परतल्यानंतर अभिनवला समजले पत्नी रुबीनाच्या कोरोना चाचणीबाबत, म्हणाला ‘तिच्याकडे जाऊन काहीच फायदा होणार नाही’


Leave A Reply

Your email address will not be published.