Monday, July 1, 2024

काय सांगता! ‘यामुळे’ चित्रपटांमध्ये शर्ट काढतो सलमान खान, जाणून व्हाल थक्क

दबंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान (Salman Khan) हे बॉलिवूडमधील एक असे नाव आहे, ज्याची चित्रपटात केवळ उपस्थिती हिट होण्याची हमी देते. सलमान खान रोजच चर्चेत असतो. यासोबतच तो त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखला जातो. चित्रपटांमध्ये शर्ट काढण्याच्या बाबतीतही त्याची बरोबरी नाही. ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील गाण्यात सलमान खानने पहिल्यांदा शर्ट काढला होता. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्याची दमदार बॉडी पाहायला मिळाली.

चित्रपटांमध्ये शर्ट का काढतो सलमान खान?
सलमान खानच्या चाहत्यांच्या मनात हा प्रश्न पडतो की, तो चित्रपटात शर्ट का काढतो. तर यावर खुद्द सलमाननेच उत्तर दिले आहे. होय, काही दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि मनीष पॉल (Manish Paul) यांनी उपस्थित लोकांना हा प्रश्न विचारले होते. शर्टलेस असण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जिनिलिया डिसूझा म्हणाली की, ‘सलमान कूल आहे म्हणून असे करतो.’ (know about salman khan showing his personality)

मात्र, सलमानने तिचे उत्तर चुकीचे ठरवत या प्रश्नाचे उत्तर स्वतःच दिले. सलमानने मनीषला दिलेल्या उत्तरात म्हटले की, “मनीष, तुझ्याकडे महागडी आणि आलिशान कार असेल तर ती झाकून ठेवशील का?” यावर मनीष पॉलही म्हणतो, “नाही, मी तर खूप दाखवेन.”

सध्या सलमान खान त्याच्या आगामी ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि ‘टायगर ३’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही चित्रपटांची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

‘या’ एका व्यक्तीने घोळ घातला नसता तर; मन्नतचा मालक सलमान खान असता, खुद्द भाईजानने केला खुलासा

हे देखील वाचा