ओळख मिळवायचीय तर बदला नाव! ‘मिस हवाहवाई’ श्रीदेवीपासून ते ‘एव्हरग्रीन’ रेखापर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी बदललंय आपलं नाव


आजकाल अनेक कलाकार ‘लक’वर विश्वास ठेवून त्यांच्या नावामध्ये बदल करतात. ही बाब सध्याच्या घडीला खूपच सामान्य झाली आहे. शिवाय बॉलिवूडमध्ये असेही अनेक कलाकार आहेत, ज्यांनी या क्षेत्रात येण्याआधी किंवा आल्यानंतर त्यांचे नाव वेगळे लावले आहे, किंवा बदलले आहे. कियारा अडवाणी, अक्षय कुमार ही अशाच स्वरूपाची काही उदाहरण आहेत. आज आपण या लेखात अशाच काही अभिनेत्रीची नावे पाहणार आहोत, ज्यांनी या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर किंवा येण्याआधी त्यांच्या नावात बदल केला.

रेखा
एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रेखा, या क्षेत्रात आल्यापासूनच सर्वाना वेड लावत आहे, त्यांचे सौंदर्य, त्यांच्या अदा, त्यांचा डान्स अजूनही बघणाऱ्यांना घायाळ करतात. मात्र, तुम्हाला माहित आहे का, रेखा यांचे खरे नाव वेगळेच आहे. रेखा या तामिळ अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पावली यांची मुलगी. त्यांचे खरे नाव ‘भानुरेखा गणेशन’ आहे, नंतर त्यांनी रेखा हेच नाव इंडस्ट्रीमध्ये लावले.

श्रीदेवी
‘मिस हवाहवाई’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीदेवी यांनी अनेक हिट सिनेमे दिले. त्यांनीसुद्धा त्यांच्या डान्स आणि सौंदर्याने खूप लोकप्रियता मिळवली. श्रीदेवी यांचे खरे नाव श्री ‘अम्मा अयंगर अप्पम’ आहे. त्यांनी या हिंदी सिनेसृष्टीमधे आल्यावर त्यांचे नाव श्रीदेवी ठेवले होते.

तब्बू 
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने देखील अनेक मोठ्या आणि हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. तमिल, तेलुगु, मल्याळम, बांग्ला आणि एका हॉलिवूड सिनेमात काम करणाऱ्या तब्बूचे खरे नाव ‘तबस्सुम फातिमा हाशमी’ आहे.

कॅटरिना कैफ
आपल्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ. अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम करणाऱ्या आणि सुपरहिट सिनेमे देणाऱ्या कॅटरिनाचे खरे नाव ‘कॅटरीना टर्क्योट’ होते. मात्र, सलमान खानच्या सांगण्यावरून तिने तिचे नाव बदलले.

शिल्पा शेट्टी
हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात फिट अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण शिल्पा हे तिचे खरे नाव नाही, तिचे खरे नाव ‘अश्विनी शेट्टी’ आहे.

मंदाकिनी
जुन्या काळातील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणजे मंदाकिनी. पण हे त्यांचे खरे नाव नव्हते. आधी ‘यास्मीन जोसेफ’ असणाऱ्या मंदाकिनी यांनी देखील नाव बदलून या इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली होती.

महिमा चौधरी
परदेस सिनेमातून अभिनयात प्रवेश करणाऱ्या महिमाचे खरे नाव ‘रितू चौधरी’ असे होते.

रीना रॉय
जुन्या काळातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या रीना रॉय यांचे खरे नाव ‘सायरा अली’ होते. या इंडस्ट्रीमध्ये येताना त्यांच्या आईने त्यांचे नाव रूप रॉय केले. मात्र, ‘जरुरत’ सिनेमात निवड झाल्यानंतर निर्मात्यांनी त्यांचे नाव रीना रॉय ठेवले.

मल्लिका शेरावत
अतिशय बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मल्लिका शेरावतचे नाव देखील वेगळे होते.

‘रीमा लांबा’ असलेले तिचे नाव तिने बॉलीवूडमध्ये बदलून मल्लिका शेरावत ठेवले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ
-‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त अभिनेत्री अक्षरा सिंगचे नवे गाणे रिलीझ, चाहत्यांकडून मिळतोय उत्तम प्रतिसाद
-‘तोंडात पान मसाला टाकून मामींना गाणी बोलायला लावतात अध्यक्ष महोदय’, अमृता फडणवीस नवीन गाण्यावर जोरदार ट्रोल


Leave A Reply

Your email address will not be published.