Thursday, April 25, 2024

चित्रपटसृष्टीतील सिंगल ‘बापमाणसं’, जे त्यांच्या मुलांना एकटेच देतायत आई- वडिलांचे प्रेम

प्रेम, समर्पण, त्याग आदी अनेक गोष्टींसाठी वडील ओळखले जातात. मुलांसाठी वडील नेहमी योग्य दिशादर्शक असतात. आपल्या मनात त्यांच्याबद्दल असणारा भीतीयुक्त आदर आणि त्यांच्या रागातही असणारे त्यांचे प्रेम नक्कीच जगावेगळे आणि अवर्णनीय आहे. आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संपूर्ण जगाशी लढणारे आपले वडील नक्कीच सर्वांसाठी खास असतात.

सामान्यतः तसे पाहिले, तर मुलं नेहमीच त्यांच्या आईच्या जास्त जवळ असतात. वडील कामानिमित्त जास्त वेळ घराबाहेर असल्याने आईच मुलांना योग्य संस्कार देते. या जगात उभं राहण्यासाठी बळ देते, जगाशी लढण्यासाठी प्रेरणा देते. मात्र, अशी अनेक उदाहरण आहेत जिथे आईची सर्व कर्तव्ये वडील पूर्ण करत आहेत. कारण काहीही असले तरी आईच्या सर्व जबाबदाऱ्या वडील अगदी योग्य पद्धतीने निभावतात. सोबत वडिलांची देखील कर्तव्ये पार पडत असल्याची अनेक उदाहरण चित्रपटसृष्टीतही खूप आहेत. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘पितृदिन’ साजरा केला जातो. रविवारी (२० जून) हा खास दिवस आहे. चला तर मग ‘पितृदिना’च्या दिनानिमित्त जाणून घेऊया अशीच एकही नावे.

करण जोहर
सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहरचे नाव सर्वात आधी येते. करण त्याच्या रुही आणि यश या दोन मुलांना एकटा सांभाळत आहे. सरोगसीच्या माध्यमातून जन्म झालेल्या या मुलांची सर्व जबाबदारी करण योग्य पद्धतीने पार पाडत आहे.

तुषार कपूर
तुषार कपूर देखील एक सिंगल फादर आहे. तुषारच्या मुलाचे नाव लक्ष्य असून त्याचा जन्म देखील सरोगसीने झाला आहे. तुषार नेहमी त्याच्या मुलाचे फोटो शेअर करत असतो.

चंद्रचूड सिंग
‘आर्या’ वेबसीरिजमधून धमाकेदार कमबॅक करणारा चंद्रचूड सिंग देखील त्याच्या मुलाला एकटाच सांभाळतो. तो त्याचा जास्त वेळ मुलासोबतच घालवताना दिसतो.

राहुल देव
हिंदी आणि दाक्षिणात्य अभिनेता राहुल देव देखील त्याच्या मुलाला सिद्धार्थला एकटा सांभाळतो. २०१० साली राहुलच्या बायकोचे कॅन्सरने निधन झाले होते. सध्या राहुलचा मुलगा यूकेमध्ये शिकत आहे.\

राहुल बोस
प्रतिभावान अभिनेता राहुल बोस चक्क सहा मुलांचा सिंगल फादर आहे.

लग्नाआधी त्याने अंदमान निकोबारच्या ६ मुलांना दत्तक घेतले असून तो त्यांची संपूर्ण जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूट्यूब व्हिडिओने केली करिअरची सुरुवात; आज हनी सिंग आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक; आलिशान गाड्यांची लागलीय लाईन

-वडिलांच्या प्रेम आणि त्यागावर आधारित हिंदी चित्रपट, ज्यांनी दिली अनोखी ओळख; ‘फादर्स डे’निमित्त घ्या जाणून

-जेव्हा राजेश खन्नांनी अमिताभ यांना विचारले, ‘सुपरस्टार झाल्यावर कसे वाटते?’; ‘या’ शब्दांत दिली होती ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया

हे देखील वाचा