Thursday, March 28, 2024

जेव्हा राजेश खन्नांनी अमिताभ यांना विचारले, ‘सुपरस्टार झाल्यावर कसे वाटते?’; ‘या’ शब्दांत दिली होती ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया

बॉलिवूड हे असे आभासी जग आहे, जिथे नेहमी उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. या ग्लॅमर जगात किंबहुना कोणत्याही क्षेत्रात वावरताना एक सत्य नेहमी लक्षात ठेवावे लागते, की कधी ना कधी आपल्या जागेवर नवीन कोणी येणार आहे. या क्षेत्रात मिळणारे यश हे कायमस्वरूपी कधीच नसते. त्यामुळे आज इथे एखादा सुपरस्टार असेल तर उद्या दुसरा कोणी सुपरस्टार होईल. मात्र ही गोष्ट किंवा हे सत्य काही कलाकार समजून घेत नाही. आपणच कायम सुपरस्टार राहणार या अविर्भावात जगणाऱ्या काही कलाकारांना त्यांचे अपयश किंवा त्यांचे अस्थिर होणारे स्टारडम पचवता येत नाही. यातलेच एक अभिनेते होते राजेश खन्ना.

‘उपर आका नीचे काका’ असे राजेश खन्ना यांचे स्टारडम पाहून नेहमीच म्हटले जायचे. एका पाठोपाठ एक १५ सुपरहिट सिनेमे देणारे राजेश खन्ना बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते. त्यांच्याबाबत नेहमीच म्हटले जाते की, त्यांनी जे यश आणि लोकांचे प्रेम अनुभवले ते कोणालाच अनुभवला आले नाही. एका काळ होता जेव्हा इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना यांच्याशिवाय कोणाला काहीच दिसायचे नाही. मात्र जसे दिवसानंतर रात्र येतेच, तसेच राजेश खन्ना यांच्या यशाच्या दिवसांमध्येच दुसरीकडे अमिताभ बच्चन या सिताऱ्याचा उदय होत होता.

हळूहळू ‘काकांची’ चाहत्यांवर असणारी मोहिनी कमीकमी होऊ लागली, आणि अमिताभ बच्चन यांची जादू पसरायला सुरुवात झाली. हे पाहून राजेश खन्ना यांना अमिताभ यांचा हेवा वाटू लागला. पुढे अमिताभ मोठे अभिनेते झाले. त्यानंतर एका मासिकाच्या मुलाखतीवेळी राजेश खन्ना यांनी अमिताभ यांना विचारले की, “सुपरस्टार झाल्यावर कसे वाटत आहे?” पुढे राजेश खन्ना म्हणाले, “‘नमक हराम’, आणि ‘दिवार’ या सिनेमांच्या प्रदर्शनानंतर तुम्ही सुपरस्टार झाले आहात. मी असे यासाठी विचारत आहे कारण एकेकाळी मी जेव्हा टॉपवर होतो तेव्हा माझ्याबद्दल सगळीकडे सुपरस्टारडम शब्दाचा वापर केला जायचा.” (when rajesh khanna asked amitabh bachhan how you felt after becoming superstar in interview)

यावर अमिताभ म्हणाले, “मला वाटते माझे यश स्क्रिप्ट, निर्माता आणि सह कलाकार यांच्यावर अवलंबून आहे. या सर्वांनी मला जिथे पोहचवले तिथेच मी पोहचलो आहे.” अमिताभ बच्चन यांनी कायम त्यांच्या यशाचे श्रेय दुसऱ्यांना आणि प्रेक्षकांना दिले आहे.

राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘आनंद’ या सिनेमात काम केले. हा सिनेमा तुफान यशस्वी झाला. राजेश खन्ना यांना देखील अमिताभ बच्चन प्रतिभावान असल्याचे माहित होते. जेव्हा राजेश खन्ना यांनी अमिताभ यांचा ‘नमक हराम’ हा सिनेमा पाहिला, तेव्हा ते ऋषिकेश मुखर्जी यांना म्हणले, ‘हा मुलगा नक्कीच मोठा सुपरस्टार होणार.’ असे असूनही राजेश खन्ना यांनाच टॉपवर राहायचे होते. त्यांना टॉपवर राहण्याची सवय झाली होती. त्यामुळे आपली जागा आता दुसरा कलाकार घेत आहे ही कल्पना किंवा ते सत्य त्यांना मान्य नव्हते.

अमिताभ बच्चन स्वतः राजेश खन्ना यांचे सर्वात मोठे फॅन होते. राजेश खन्ना यांच्यासोबत काम करणे अमिताभ आपले भाग्य समजायचे. अमिताभ यांनी ‘अँग्री यंग मॅन’ बनत प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव दिला. अमिताभ यांनी त्यांच्या अभिनयासोबतच दमदार ऍक्शनने प्रेक्षकांवर मोहिनी घातली. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला मिळाले. म्हणून देखील अमिताभ यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली. अमिताभ यांचा आवाज, त्यांची उंची, त्यांचा अभिनय एकंदरीत अमिताभ यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाने रसिकांना घायाळ केले होते. आजही अमिताभ यांच्या अभिनयाची, आवाजाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.

आज वयाच्या ७० व्या वर्षी देखील अमिताभ त्याच जोशाने आणि स्फूर्तीने चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात काम करत आहे. लवकरच ते ‘चेहरे’, ‘झुंड’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे आगामी पर्व देखील होस्ट करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोशल मीडियावर व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा नवा लूक; तर चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा

-‘अक्षय कुमारला मीच स्टार बनवले, नाहीतर तो…’ लाईव्ह सेशनमध्ये गायक अभिजित भट्टाचार्य यांचा मोठा दावा

-ऐश्वर्याला अशाप्रकारे मिळाली होती ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील नंदिनीची भूमिका; दिग्दर्शकाने केला होता खुलासा

हे देखील वाचा