×

केआरकेच्या ट्विटवर ज्युनिअर बच्चनने दिले ‘असे’ खडेबोल उत्तर की, ‘सो कॉल्ड’ क्रिटिकची बोलतीच झाली बंद

बॉलिवूडमध्ये केआरके म्हणजेच कमाल आर खान हा त्याच्या वक्त्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटाचा समीक्षक असलेला केआरके दरदिवशी कोणत्या ना कोणत्या कलाकाराचे समीक्षण करत असतो. बॉलिवूडमध्ये अगदी एखादाच असा कलाकार असेल ज्याची केआरकेने खिल्ली उडविली नसेल. परंतु या वेळी केआरकेला चांगलेच उत्तर मिळाले आहे. अभिषेक बच्चनने एका ट्विटवर केआरकेला खडेबोल सुनावले आहे. ज्या नंतर त्याची बोलती बंद झाली आहे. सोशल मीडियावर युजर देखील अभिषेक बच्चनच्या या उत्तराचे कौतुक करत आहे. तर दुसरीकडे केआरके त्याचा बचाव करताना दिसत आहे.

अभिषेक बच्चनने त्याच्या ट्विटरवर शनिवारी (१९ फेब्रुवारी) ‘वाशी’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत टोविनो थॉमस आणि कीर्ती सुरेश दिसणार आहेत. हा पोस्टर शेअर करून त्याने मल्याळम फिल्म उद्योगमधून येणारा एक आणखी अविश्वसनीय चित्रपट म्हटले. या ट्विटवर केआरकेने मजा उडवताना म्हटले की, “भावा तू कधी बॉलिवूडसाठी पण अविश्वसनीय चित्रपट बनव.” अभिषेक बच्चनला केआरकेचे हे उत्तर अजिबात आवडले नाही. त्याने त्याला खडेबोल उत्तर देताना कमाल खनला त्याचा ‘देशद्रोही’ या चित्रपटाची आठवण करून दिली

अभिषेक बच्चनने केआरकेच्या या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, “प्रयत्न करेल. तुम्ही बनवला होता ना देश द्रोही.” अभिषेकच्या उत्तराने सोशल मीडिया युजर खूप खुश झाले आहेत आणि सगळेजण त्याचे कौतुक करत आहेत. २००८ मध्ये आलेला केआरकेचा ‘देशद्रोही’ हा चित्रपट सुपरफ्लॉप झाला होता.

अभिषेक बच्चनच्या या ट्विटवर कोट करत या युजरने लिहिले की, “केआरकेची एवढी इज्जत कधीच निघाली नव्हती. केआरके द समोसा क्रिटिक. तसे पण चित्रपटाचे नाव अगदी बरोबर होते, देशद्रोही.” अशाप्रकारे आणखी एका युजरने लिहिले की, लेलो यार, बॉलिवूडचा खरा मास्टरपिस.” तसेच आणखी एक युजर कमेंट करताना दिसत आहेत.

अभिषेक बच्चनचे हे उत्तर ऐकून केआरके स्वतः चा बचाव करताना दिसत आहे. त्याने केवळ अभिषेकच्या ट्विटवर “हा हा हा! माझ्या चित्रपटाच्या बजेट पेक्षा जास्त तर तुमच्या मेकअप मॅनचे बजेट असते. दुसरा चित्रपट तुम्ही बॉलिवूडवाल्यांनी बनवून दिला नाही, नाहीतर तो ब्लॉक बस्तर झाला असता,” अशाप्रकारे त्यांच्यात जुगलबंदी होताना दिसत आहे.

हेही वाचा :

Latest Post