Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन कुशलला सलतंय जोडीदार गमावण्याचं दुःख ! सोशल मिडीयावर व्यक्त केल्या भावना…

कुशलला सलतंय जोडीदार गमावण्याचं दुःख ! सोशल मिडीयावर व्यक्त केल्या भावना…

कुशल बद्रिके हा मराठी सिनेविश्वातील प्रसिद्द अभिनेता आहे. चांगला अभिनय आणि जबरदस्त कॉमेडीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गरीब परिवारातून पुढे आलेल्या कुशलने मेहनत आणि कष्टाच्या बळावर स्वतःची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील गमती-जमती तो चाहत्यांना पोस्टद्वारे शेयर करत असतो. 

कुशलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने त्याचं एक दुःख सांगितलं आहे. कुशल म्हणतो, “माणसाला एकवेळ हरवलेलं सुख सापडेल पण, सुकत घातलेल्या सॉक्सच्या जोडीतील एक सॉक्स हरवला तर तुम्हाला सांगतो, शोधून देव सापडेल. पण, तो एक सॉक्स काही सापडायचा नाही. आयुष्यात जोडीदार गमावण्याचं दुःख काय असू शकतं, याची जाणीव मला मी कामाला निघालेलो असताना हाती लागलेल्या त्या एका सॉक्सकडे बघून येते”

पुढे तो म्हणतो, “आपल्या जुन्या प्रेयसींच्या आठवणींसारखे मी ते उरलेले एक-एक सॉक्स एका पिशवीत सांभाळून ठेवले होते. आता पावसाळ्यात पाय थंड पडले की माझी बायको ते वेगवेगळ्या रंगाचे सॉक्स अगदी आनंदाने घालते. आता प्रेयसीच्या आठवणींसारखे जपून ठेवलेत म्हटल्यावर बायकोच्या पायदळी तुडवलं जाणं, हे त्यांच्या नशीबी आलंच. मी पण संसाराला सरावल्यासारखा तिला म्हणतो, टाकाऊपासून टिकाऊ तुला छान जमत हा… त्यावर उत्तरादाखल ती आमच्या लग्नाचा फोटो मला दाखवते. असो, पण मला असं वाटतं की आपण त्या सॉक्ससारखे आहोत. कधीकधी जोडीदार सोबत असतानाही हरवल्यासारखे… आणि कधी कधी एकटे असतानाही उपयोगात असलेले स्वतःला नव्याने गवसल्यासारखे.”कुशलच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी सुंदर कमेंट केल्या आहेत त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

वर्षाताई उभा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा आहे ! अभिनेत्री सुरेखा कुडची यांची फेसबुक पोस्ट चर्चेत…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा