Friday, September 20, 2024
Home मराठी ‘लापतागंज’मधील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

‘लापतागंज’मधील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

मनोरंजन विश्वातून एक वाइट बातमी समोर आली आहे. सब टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘लपतागंज’मध्ये काम करणारा प्रसिद्ध अभिनेते अरविंद कुमार याचे निधन झाले आहे. त्याने 10 जुलै रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे त्याचे निधन झाले आहे.

सब टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘लापतागंज’ मध्ये अरविंदने चौरसियाची भूमिका साकारली होती. जी खूप प्रसिद्ध आहे. अरविंद कुमार(Actor Arvind Kumar) याने अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेच. माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेता अरविंद शूटिंगसाठी जात होता. त्यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी अरविंदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास घेतला होता. (‘Lapataganj’ popular actor Arvind Kumar has passed away)

(हि बातमी अपडेट होत आहे.)

अधिक वाचा- 
उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण? प्रसिद्ध दिग्दर्शकाची अभिनेत्रीला ऑफर
‘दादूस लई झ्याक दिस्तोयास…’ अभिनेता संतोष जुवेकरच्या ‘त्या’ पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा