×

लतादीदींचे भाऊ हृदयानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल, मुलगा आदिनाथने दिली माहिती

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे धाकटे भाऊ गायक हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा आदिनाथ मंगेशकरने (Adinath Mangeshkar) दिली आहे. मात्र, त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना आदिनाथने वडिलांच्या रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली.

सत्कार समारंभात षण्मुखानंद सभागृहात भाषण करताना हृदयनाथ मंगेशकर यांचा मुलगा आदिनाथ म्हणाला, “इतकी वर्षे माझे वडील पंडित हृदयनाथ मंगेशकर जी, जे स्वागत भाषण आणि आमच्या ट्रस्टची (मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट) माहिती द्यायचे. पण या वर्षी ते हॉस्पिटलमध्ये असल्याने, इथे उपस्थित राहू शकले नाहीत.” पुढे त्याने सांगितले की, वडिलांची प्रकृती आता ठीक आहे आणि देवाच्या कृपेने ते आठ-दहा दिवसांत घरी परततील. (lata mangeshkar brother hridaynath mangeshkar is admitted in hospital)

मोदींनी दिल्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत, त्यामुळे ते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत, हृदयनाथ मंगेशकर यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

दरवर्षी दिला जाणार पुरस्कार
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर, त्यांचे कुटुंबीय आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टने या वर्षाच्या सुरुवातीला लताजींच्या सन्मानार्थ एक पुरस्कार देण्याचे ठरवले होते. हा पुरस्कार आता दरवर्षी दिला जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post