दु:खद! बॉलिवूडला ‘लंबी जुदाई’ गाणं देणाऱ्या पाकिस्तानी गायिका रेशमा यांच्या मुलाचं निधन

Legendary Pakistani Lambi Judai Singer Reshma's Son Passed Away


पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका रेशमा यांच्या मुलाचे निधन झाले आहे. कार्डिऍक अरेस्टमुळे त्यांच्या मुलाने या जगाचा निरोप घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायिका रेशमाचा मुलगा सावन ‘सुई नॉर्दर्न गॅस कंपनी’मध्ये काम करत होता. यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, आपल्या आईनंतर त्यानेही या जगाला अलविदा केला आहे.

त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळ आणि ठिकाणाची अद्याप घोषणा झालेली नाही. रेशमा यांचा मुलगा सावनने आपल्या आईकडून प्रेरणा घेतली होती, त्यामुळे तोदेखील गाणी गायचा. तरीही, रेशमा यांना देश, परदेशात आपल्या गायकीसाठी ओळखले जात होते, परंतु सावनला आपल्या आईप्रमाणे ती ओळख मिळू शकली नव्हती.

रेशमा यांचे सन २०१३ मध्ये निधन झाले होते. त्यांना त्यांच्या कलेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. रेशमा यांना इतर पुरस्कारांसोबतच पाकिस्तानमध्ये तिसऱ्या सर्वोच्च आणि नागरिक पुरस्कार ‘सितार- ए- इम्तियाज’ने सन्मानित केले होते.

त्यांचे गीत आणि दमदार आवाजासाठी त्यांची आजही आठवण काढली जाते. रेशमा आणि भारताचे खूप जुने नाते होते. पाकिस्तानमध्ये राहत असल्या, तरीही त्या कधीच भारताला विसरू शकल्या नव्हत्या. त्यांचा जन्म सन १९४७ मध्ये राजस्थानमधील बिकानेरच्या मलासा गावात झाला होता. स्वातंत्र्यासोबच हे कुटुंब पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाले होते. रेशमा यांचे औपचारिक शिक्षण झाले नव्हते. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासूनच गायनाला सुरुवात केली होती. यानंतर त्यांना रेडिओ पाकिस्तानमध्ये ‘लाल मेरी’ हे गाणं रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली होती.

हे गाणे हिट झाल्यानंतर सन १९६० मध्ये त्या पहिल्यांदा टीव्हीवर दिसल्या. यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये जबरदस्त वाढ झाली होती. त्यांनी पाकिस्तानी आणि भारतीय चित्रपट उद्योगात काम केले. त्यांच्या आवाजात गायलेले ‘लंबी जुदाई’ आजही अद्वितीय समजले जाते. हे गाणे सन १९८३ साली रिलीझ झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. हा जॅकी यांचा दुसरा चित्रपट होता.

ऐंशीच्या दशकात रेशमा या कला क्षेत्राची जाण असणारे डॉ. एस. के. पुनिया यांच्या कुटुंबाशी जोडल्या गेल्या होत्या. त्यांना त्या आपला भाऊ मानत असायच्या. मानलेला भाऊ म्हटल्यावर त्या चिडत नसायच्या. त्या म्हणायच्या की, “ये मुंह से नहीं बल्कि दिल से भाई है.” डॉ. एस. के. पुनिया रेशमा यांच्या येथील सुजानगढशी निगडीत होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉटनेस ओव्हरलोड! तेलुगु अभिनेत्रीचे स्विमिंग पूलवरील बिकिनीतील फोटोशूट होतंय व्हायरल, पाहा बोल्ड फोटो

-नादच खुळा! ‘तेरी मिट्टी’ गाण्याला आवाज देणाऱ्या बी प्राकचं नवीन गाणं रिलीझ, होतंय जोरदार व्हायरल

-बजरंगी भाईजाच्या मुन्नीने पुन्हा वेधले चाहत्यांचे लक्ष, डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल!!


Leave A Reply

Your email address will not be published.