Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सर्वात लांब किसिंग सीन्स, ज्यांनी पार केल्या होत्या सर्व सीमा!

‘हे’ आहेत बॉलिवूडमधील सर्वात लांब किसिंग सीन्स, ज्यांनी पार केल्या होत्या सर्व सीमा!

किसिंग सीन हा सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहे. जर आपण किस सीनबद्दल बोललो, तर हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत चित्रपटांच्या काही प्रसिद्ध सीन्सचा उल्लेख नक्कीच होतो. आज आपण पाहुयात अशाच काही चित्रपटातील सीन, जे त्यावेळी खूप चर्चेत राहिले होते. 

राजा हिंदुस्तानी
तुम्हाला ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि आमिर खानचा (Aamir Khan) किसिंग सीन आठवतोय का? हा चित्रपट जितका चर्चेत होता, तितकाच या दोन कलाकारांनी केलेला लांब किसिंग सीनही चर्चेत बराच चर्चा रंगवून गेला. (Longest kissing scenes in bollywood movies)

मर्डर
बॉलिवूड सीरियल किसर इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) अनेक चित्रपटात बोल्ड किसिंग सीन दिले आहेत. मात्र ‘मर्डर’ चित्रपटात मल्लिका शेरावतसोबत (Malliak Sherawat) इतका लांब किसिंग सीन शूट केला गेला की, या सीनमुळेच हा चित्रपट अधिक चर्चेत आला होता.

जब वी मेट
‘जब वी मेट’ चित्रपटात करीना कपूर (Kareena Kapoor) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांच्या जबरदस्त केमिस्ट्रीमुळे खूप हिट झाला. तर यामधील शेतातील त्यांचा किसिंग सीन कसा विसरता येईल! या किसिंग सीनचीही खूप चर्चा झाली होती.

धूम २
लग्नाआधी रिलीझ झालेला ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai) ‘धूम २’ हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटातील ऐश्वर्या आणि ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) जबरदस्त किसिंग सीनही त्यावेळी चर्चेचा विषय बनला होता.

ये जवानी है दिवानी
मैत्री आणि प्रेमाची उत्तम व्याख्या सादर करणाऱ्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला तरुणाईने खूप प्रेम दिले. ब्रेकअपनंतर दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी या चित्रपटात एक लांब आणि पॅशनेट किसिंग सीन दिला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

क्या बात है! ‘हा’ साऊथ सुपरस्टार झाला मुंबईकर, खरेदी केले तब्बल ७० कोटींचे आलिशान घर

गुपित झाले उघड! ‘टायगर 3’ मधील शाहरुखचा कॅमिओ सीन लीक, पठाणच्या मदतीने टायगर करणार पलायन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा