प्रेम, लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी असतात, पण प्रत्येकालाच ज्या व्यक्तीवर प्रेम असते, त्याच्याशीच लग्न करता येत नाही. सामान्य माणसांच्या आयुष्यातच नाही, तर सेलिब्रेटींच्या आयुष्यातही अशा गोष्टी घडतात. या लेखातून आपण त्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे एकमेकांवर प्रेम होते, पण लग्न मात्र त्यांनी दुसऱ्यांशी केलं.
दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर
असा विषय निघाला की, सध्या आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात ते म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर. असं म्हटलं जातं की ‘बचना है हसिनो’ या चित्रपटापासून दीपिका आणि रणबीर एकमेकांच्या जवळ आले होते. त्यांच्यात एकदम सीरियस रिलेशन होतं. दीपिकाने तर रणबीरच्या नावाच्या पहिल्या अक्षरांचा टॅट्यूही काढून घेतला होता, पण रणबीर दीपिकाबरोबरच कटरिना कैफलाही डेट करत असल्याचे दीपिकाला समजल्यानंतर मात्र या दोघांच्या नात्याची अखेर झाली. नंतर दोघांनीही वाद बाजूला ठेवत करिअरवर परिणाम होऊ दिला नाही. त्यांनी ब्रेकअपनंतरही ‘ये जवानी है दिवानी’, ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये काम केले. आता दीपिकाचं रणवीर सिंग आणि रणबीरचं आलिया भटबरोबर लग्न झालं असून हे दोघेही आपापल्या संसारात सुखी आहेत.
ऐश्वर्या राय आणि सलमान खान
अनेकांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि भाईजान सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चाही बऱ्याच रंगल्या. ‘हम दिल दे चूके सनम’ या चित्रपटावेळी ऐश्वर्या आणि सलमान जवळ आल्याचे म्हटले जाते, पण सलमानच्या आक्रमक स्वभावामुळे त्यांच्याच ब्रेकअप झाल्याचेही अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले. ऐश्वर्याने अन्य अभिनेत्यांबरोबर असणे सलमानला आवडत नसल्याचेही सांगण्यात येते. अखेर सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय हे देखील रिलेशनशिपमध्ये आल्याचे समजले होते, पण त्यांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहचू शकली नाही. अखेर काहीवर्षांनी २००७ मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनबरोबर लग्न केले आणि आता ती त्याच्याबरोबर सुखाने संसार करत आहे. सलमान मात्र अजूनही अविवाहित आहे, तर विवेक ओबेरॉयने प्रियांका अल्वाबरोबर २०१० मध्ये लग्न केले.
शाहिद कपूर आणि करीना कपूर
बॉलिवूडमध्ये गाजलेल्या जोडप्यांमध्ये शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचेही नाव येते. या दोघांमध्येही जवळपास ५ वर्षे रिलेशन होते, असं म्हटलं जातं. त्यांनी फिदा, ३६ चायना टाऊन, मिलेंगे मिलेंगे, चूपचूप के, जब वी मेट असे चित्रपटही एकत्र केले. अनेकदा हे दोघ त्यांच्या रिलेशनबद्दल बोलतानाही दिसले, तसेच असंही अनेक रिपोर्ट्स सांगतात की, करीना शाहिदसाठी शुद्ध शाकाहारी बनली होती. करीनाची बहीण करिश्मा कपूर आणि आई बबिता कपूर या नात्याच्या विरोधात होत्या. अखेर ‘जब वी मेट’च्या शूट दरम्यान या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर काही वर्षांनी करीनाने सैफ अली खानशी, तर शाहिदने मीराशी लग्न केले. ते आता त्यांच्या संसारात रमले असून त्यांना मुलंही झाली आहेत.
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू
जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेकांना माहिती आहे. जिस्म चित्रपटावेळी या दोघांमधील प्रेम फुलले होते. या दोघांची जोडी अनेकांसाठी उदाहरण ठरत होती, पण ९ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यात ब्रेकअप होण्यामागे कमिटमेंट इश्यू असल्याचे सांगितले जाते, पण या ब्रेकअपनंतर जॉनने प्रिया पांचालबरोबर आणि बिपाशा बासूने करण सिंग ग्रोवरबरोबर लग्न केले.
अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी
नव्वदच्या दशकात गाजलेली जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी. ‘मैं खिलाडू तू अनाडी’ या चित्रपटादरम्यान या दोघांमध्ये जवळीकता निर्माण झाली होती. पुढे या दोघांमध्ये रिलेशनशिपही सुरू झाली, पण अनेक रिपोर्ट्सनुसार शिल्पा शेट्टीला अक्षय कुमारने धोका दिल्याचे सांगितले जाते. त्याचमुळे त्यांच्यात ब्रेकअप झाला. असे सांगितले जाते की, शिल्पा शेट्टीबरोबरच अक्षय कुमार ट्विंकल खन्नाबरोबरही अफेअर करत होता. अखेर शिल्पाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले, तर शिल्पाने राज कुंद्राबरोबर संसार थाटला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मिथुनदा आणि श्रीदेवीच्या किसींग सीनमुळे झालेला मोठा राडा, अभिनेत्रीने थेट पत्रकारांपुढेच…
दोघं संगतीनं…! थेट बायकोला घेऊन सोशल मीडियावर हवा करणारे जोडपे, जगभरात गाजतंय यांचं नाव
बाप आणि त्याचं मुलांवरील प्रेम ‘या’ सिनेमांनी दाखवून दिलं, एका क्लिकवर घ्या जाणून