Friday, March 29, 2024

‘ज्या’ व्यक्तीवर दिलीप कुमार वेड्यासारखे प्रेम करायचे, तिच्याच विरुद्ध कोर्टात दिली होती साक्ष

जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार असतात. अशी एकही व्यक्ती नसेल जिच्या आयुष्यात सुख किंवा दुःख आले नसेल. हीच गोष्ट जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असलेल्या प्रेमालाही लागू होते.  काही असे प्रेमप्रकरणं असतात जी कधीच शेवटपर्यंत टिकत नाहीत आणि जरी थोडीफार टिकली तरी त्याचा अंत म्हणावा तसा होत नाही. अशाच एका प्रेमप्रकरणाबद्दल बोलायचे झाल्यास मधुबाला आणि दिलीप कुमार जोडीचे नाव आवर्जून घेतले जाते. ज्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, परंतु त्यांच्या प्रेमाचा शेवट काहीसा वेगळाच झाला.

२३ फेब्रुवारी १९६९ रोजी मधुबालाने वयाच्या ३६व्या वर्षी जगाचा निरोप तिने घेतला होता. गेली पाच दशके भारतीय रसिकांच्या मनात मनमोहक सौंदर्याचं नाव म्हणून मधुबालाची प्रतिमा आजही अबाधित आहे आणि राहील.

सौंदर्याची दुसरी खान म्हणजे मधुबाला. एक काळ असा होता की तिच्या ह्या रूपावर लाखो चाहते मरत होते. आपल्या निरागस चेहऱ्याने ती कोणालाही आकर्षित करायची. मात्र ती फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीसाठी जगत होती, आणि तो म्हणजे युसूफ अर्थातच दिलीप कुमार. आपला अभिनय आणि अनोखा अंदाज याच्या बळावर त्यावेळी दिलीप सुद्धा कलाविश्वात कोहिनुर ठरला होते.

सन १९४२ मध्ये बालकलाकार म्हणून ‘बसंत’ सिनेमात मधुबाला हिने पहिल्यांदा काम केले. त्यानंतर १९४९ मध्ये अशोक कुमार यांच्या ‘महल’ या सिनेमातून तीच्या सिनेकरियरला कलाटणी मिळाली. रोमांस आणि रहस्य असलेला तो चित्रपट त्यावेळी खूप सुपरहिट ठरला. त्यानंतर दिलिपकुमार आणि मधुबाला यांची पहिली भेट झाली होती ती ‘ तराना’ या चित्रपटामध्ये आणि ह्याच चित्रपटाद्वारे त्यांच्या प्रेमकहाणीला खऱ्या अर्थाने सुरवात झाली.

असं म्हणतात की, खऱ्या प्रेमकहाणीला पूर्णत्वास नेण्यासाठी खूप कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, परंतु अशाच एका परिस्थितीने ह्या दोघांचे आयुष्य पूर्णच बदलून टाकले. या सर्व गोष्टीला कारणीभूत होते ते तिचे वडील आणि एक चित्रपट.

त्यावेळी बी. आर. चोप्रा यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटासाठी मधुबाला आणि दिलीप कुमार यांना लीड रोलमध्ये साईन केले होते आणि भोपाळमध्ये ४० दिवस या चित्रपटाचं शूटिंग होणार होते, पण मधुबालाला आउटडोर शूटिंगसाठी पाठवण्यास तिच्या वडिलांनी नकार दिला. त्यामुळे आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर गेली नाही. अखेर नाईलाजास्तव बी.आर. चोप्रा यांनी मधुबालाला ऐवजी वैजंतीमाला हिला चित्रपटासाठी साइन केले.

वैजयंतीमाल हिला या चित्रपटासाठी निवडले आहे ही गोष्ट मधुबाला आणि तिचे वडील यांना समजली. तेव्हा हे प्रकरण इतके विकोपाला गेले की त्यासाठी त्यांनी कोर्टाची पायरी चढली. त्यावेळी निर्मात्यांनी आपली बाजू मांडून मधुबालाच्या व्यावसायिक वर्तनावर प्रश्नचिन्ह उभे केले आणि त्यामुळेच त्यांनी दुसऱ्या नायिकेला या पात्रासाठी निवडले असे सांगितले. ही गोष्ट खरी ठरवण्यासाठी त्यांनी दिलीपकुमार याला साक्ष देण्यासाठी बोलावले होते.

दिलीप कुमार यांच्यासाठी तो सर्वात कठीण प्रसंग होता, ज्यावेळी त्यांच्या एका बाजूला सत्य होते तर दुसऱ्या बाजूला प्रेम. पण त्यांनी सत्याला निवडले आणि मधुबालाच्या विरोधात साक्ष दिली. त्याच्या या साक्षीने मधुबाला प्रचंड दुखावली गेली. त्यानंतर त्यांच्यात कधीही न मिटणारे अंतर आले.

दिलीप कुमार यांच्यापासून विभक्त झाल्यावर अवघ्या काही वर्षातच मधुबालाने जगाला निरोप दिला. ते दोघे कधीच एक होऊ शकले नाही. त्यांची प्रेमकहाणी जरी पूर्णत्वास गेली नसली तरी त्यांचे चित्रपट, आणि त्यांच्या प्रेमाचा प्रवास हे आजही आकर्षक आणि कुतूहलाचा विषय ठरत आहे.

सन १९४७ मध्ये आलेल्या ‘नीलकमल’ मध्ये राज कपूर सोबत मधुबाला नायिका म्हणून झळकली. तिचे सुरुवातीला चितोड विजय, दिल की रानी, अमरप्रेम, मेरे भगवान या चित्रपटातील रोल फारसे चालले नाहीत. परंतु १९४९ साली आलेल्या कमाल अमरोहीच्या महल मध्ये ‘आयेगा, आयेगा,आयेगा आनेवाला’या गाण्यामुळे मधुबाला आणि लता मंगेशकर चांगल्याच लाईमलाईटमध्ये आल्या होत्या. त्यानंतर ‘हावडा ब्रिज’ मधील क्लब डान्सच्या तिच्या भूमिकेवर सर्वच फिदा झाले होते. अशा अनेक चित्रपटाच्या माध्यमातून नाही जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

आज दिलीप कुमार यांचे वय ९८ वर्ष असून आज मधुबाला हयात असत्या तर त्यांचे वय ८८ वर्ष असते. दिलीप कुमार यांनी पुढे १९६६ साली सायरा बानू यांच्याशी लग्न केले.

हे देखील वाचा