×

The Kapil Sharma Show | शोमध्ये माधुरी दीक्षितने सांगितला ‘हा’ भन्नाट किस्सा, ऐकून तुम्हालाही येईल हसू

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या तिच्या आगामी ‘द फेम गेम’ या आगामी वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच प्रमोशनसाठी ‘द फेम गेम’ ची संपूर्ण टीम कपिल शर्माच्या (Kapil Sharma) कार्यक्रमात गेली होती. यावेळी माधुरी दीक्षितने एक असा भन्नाट किस्सा सांगितला जो ऐकून सगळेच हसायला लागले. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या अभिनयासाठी आणि घायाळ करणार्‍या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘द फेम गेम’ या वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचसाठी ती कपिल शर्माच्या कार्यक्रमात पोहोचली होती. यावेळी माधुरी सोबत ‘द फेम गेम’ची टीम आली होती. यावेळी बोलताना माधुरीने तिच्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. हा किस्सा असा आहे की, एकदा माधुरीने आपल्या ड्रायव्हरला पेन आणि कागद घेऊन यायला सांगितले, ज्यावर घरातील नसलेल्या सामानाची यादी लिहून देता येईल. मात्र ज्यावेळी ड्रायव्हर कागद घेऊन आला त्यावेळी माधुरीने त्यावर आपली सही करत कागद पुन्हा त्याच्याकडे सोपवला. का किस्सा ऐकून कार्यक्रमातील सगळेच हसायला लागले.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

अभिनेत्री माधुरी दीक्षित ‘द फेम गेम’ मधून पहिल्यांदाच ओटीटी फ्लॅटफॉर्मवर आपले पदार्पण करत आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेते संजय कपूर सुद्धा असणार आहेत. माधुरी आणि संजय कपूरने १९९५ मध्ये ‘राजा’ चित्रपटात काम केले होते. द फेम गेम ही सिरीज २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांच्यासोबत मानव कौल, मुस्कान जाफरी, लक्षवीर सरन आणि सुहासिनी मुळे असे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. दरम्यान कपिल शर्माच्या कार्यक्रमात ‘द फेम गेम’च्या टीमने खूप धमाल केली. यावेळी माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांचा डान्ससुद्धा पाहायला मिळाला.

हेही वाचा –

Latest Post