×

The Kashmir Files | विवेक अग्निहोत्री यांना धमकीचे कॉल, केली जातेय ‘ही’ मागणी

प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, यामागचे कारण आहे त्यांचा आगामी चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’. हा चित्रपट ११ मार्च रोजी भारतातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यावर्षी देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या चित्रपटाचे पोस्टर अमेरिकेतील ‘द बिग ऍपल’च्या टाइम्स स्क्वेअर टॉवरवर लावण्यात आले होते. एवढेच नाही, तर अमेरिकेत हा चित्रपट ३० हून अधिक वेळा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडित समाजाच्या हत्याकांडातील पंडितांच्या पहिल्या पिढीच्या डॉक्युमेंटरी फुटेज आणि व्हिडिओ मुलाखतींवर आधारित आहे.

विवेक अग्निहोत्री यांना धमकीचे फोन
काही लोकांना हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखायचा आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. त्यांना फोन आणि मेसेजवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. (the kashmir files director vivek agnihotri is getting death threats know the reason)

येतायेत जीवे मारण्याच्या धमक्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट अमेरिकेत ३० हून अधिक वेळा दाखवण्यात आला असून पुढील महिन्यात हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे. मात्र अमेरिकेत चित्रपट प्रदर्शित होत असतानाही विवेक यांना धमकीचे फोन येत होते. पण त्यांनी लक्ष दिले नाही. त्याचवेळी हे धमकीचे कॉल आणि मेसेज सातत्याने येत आहेत. कॉल्स आणि मेसेजमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा अन्यथा तुम्हाला आपला जीव गमवावा लागेल, असे सांगण्यात येत आहे.

‘काश्मीर फाईल्स’ आहे सत्यकथा
याआधी विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की, “प्रेक्षकांनी चित्रपटाकडून काही अपेक्षा करू नये. कारण तुम्हाला सत्याकडून काय अपेक्षा आहे? चित्रपट खरा आहे, चित्रपटाचा प्रत्येक शब्द खरा आहे, प्रत्येक कथा खरी आहे. लोकांना वाटेल की, हा चित्रपट सांप्रदायिक मुद्द्यांवर आहे किंवा विशिष्ट समुदायांना किंवा हिंगोइझमला शाप देणारा आहे. पण चित्रपटाच्या पाच मिनिटांनंतर त्यांना कळेल की असे काहीही होणार नाही.”

विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakravarti), अनुपम खेर (Anupam Kher), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post